कोल्हापूर : 'मिस यू मम्मा...' शिवाजी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये गोव्यातील तरुणीची आत्महत्या, आईसाठी लिहिले शेवटचे शब्द

मुंबई तक

• 03:10 PM • 22 Mar 2026

Shivaji University Suicide : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या इशिता सावंत या 23 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (20 मार्च) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाच्या वसतिगृहात घडली. 

Shivaji University Suicide

Shivaji University Suicide

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मिस यू मम्मा..

point

शिवाजी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये गोव्यातील तरुणीची आत्महत्या

point

आईसाठी लिहिले शेवटचे शब्द

Shivaji University Suicide, दीपक सूर्यवंशी : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या इशिता सावंत या 23 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (20 मार्च) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाच्या वसतिगृहात घडली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कुटुंबातील पाच लोकांचा अंत, दोघांचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, 3 मुलांना विष पाजल्याचा पोलिसांचा संशय

गोव्यातून शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात

गोवा राज्यातील इशिता मधुसूदन सावंत ही 23 वर्षीय तरुणी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र विभागात शिक्षण घेत होती. विद्यापीठाच्या वस्तीगृहात शुक्रवारी रात्री ती खोलीमध्ये एकटीच होती.  मध्यरात्री विद्यापीठाच्या वसतिगृहातील वॉर्डन शिला सोनवणे यांनी खोल्या तपास कामाच्या अनुषंगाने इशिताला हाक मारली. पण खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी दरवाजाच्या कवाडातून पाहिलं असता, इशिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी ताबडतोब राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली.

हे ही वाचा : अशोक खरातच्या मुलीची उपजिल्हाधिकाऱ्याच्या बायकोसोबत जमिनीची भागीदारी, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा

चिठ्ठीत काय लिहिले?

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने वसतिगृहात धाव घेवून इशिताला ताबडतोब सरकारी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्या खोलीत एक चिट्ठी सापडली असून, त्यावर 'मिस यु ममा..' असं लिहिलं होतं. मात्र इशितानं आत्महत्या का केली, हे अद्याप गूढ आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही शिवाजी विद्यापीठाच्या महिला हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती.