Maharashtra monsoon : मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाटण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांना नैसर्गिक अपत्तींना सामोरे जावे लागत आहे. कराड चिपळूण मार्गावर मल्हारपेठ येथे एक झाड पडून एक जण जखमी झाला आहे. तर चाफळ उंब्रज मार्गावर प्रवासी घेऊन निघालेल्या चालत्या जीपवर बाभळीचे झाड कोसळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे, यामुळे परिसरात चिंतेची बाब निर्माण झाली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं संकट, 'या' 7 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
साताऱ्यात जीपवर झाड कोसळून सहा जण जखमी
या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्यांची ओळख समोर आली आहे. चालक सुभाष साळुंखे, वंदना योगेश चव्हाण, पूनम शिवाजी पाटील, संभाजी पाटील, मानसिंग बाळाराम साळुंखे आणि संभाजी पाटील अशी जखमींची नावे समोर आलीत. तर ढेबेवाडी विभागातील गुडे काळगाव मार्गावर झाड कोसळल्याची घटना आहे.
स्थानिकांनी बचावकार्य सुरु होते, तसेच तातडीने मदतकार्य केले जात आहे. दरम्यान, सुरु असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने झाडे उन्मळून पडू लागली आहेत. यामुळे नैसर्गिक अपत्ती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे येथे देखील अशा घटना घडल्या आहेत. या मुसळधार पावसाने अनेक बळी घेतले आहेत. सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा : पोलीस खात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर पीएसआयने केला बलात्कार
महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील पूल कोसळला
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक पर्यटक अडकून पडल्याची घटना समोर आली. महाबळेश्वरच्या वेण्णा नदीवरील पूल कोसळला होता. यामुळे नागरिक अडकून बसले होते. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने पर्यटकांची चारचाकी वाहने क्रेनच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या आहेत.
ADVERTISEMENT












