मुंबई महानगरपालिकेला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, 'मेट्रोवुमन' अशी ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे कोण आहेत?

मुंबई तक

31 Mar 2026 (अपडेटेड: 31 Mar 2026, 04:53 PM)

मुंबई मनपाच्या आयुक्तपदी निवड होण्याआधी अश्विनी भिडे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.

Who is Ashwini Bhide

Who is Ashwini Bhide

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई महानगरपालिकेला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त

point

'मेट्रोवुमन' अशी ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे कोण आहेत?

Who is Ashwini Bhide : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. शासनाने याविषयी परिपत्रक काढले असून त्या आजच आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. मुंबई मनपाच्या इतिहासात आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. यापुढे मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अश्विनी भिडे मिळून मुंबई मनपाचा कारभार पाहणार आहेत. यामुळे मुंबई मनपात महिलाराज सुरु झाल्याचीही चर्चा रंगली आहे. 

हे वाचलं का?

मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई मनपाच्या आयुक्तपदी निवड होण्याआधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. मनपा आयुक्तपदी निवड होण्याआधी त्या मुख्यमंत्र्‍यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.  यासोबतच मेट्रो वुमन अशीही त्यांची ओळख आहे. अश्विनी भिडे नेमक्या कोण आहेत आणि त्यांची कारकीर्द कशी आहे, जाणून घेऊया.

हे ही वाचा : मुंबईसह ठाणे लोकसभेची श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी, नरेश म्हस्के यांना संधी, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांची यादी समोर

कोल्हापूरमधून प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात

अश्विनी भिडे या मूळच्या सांगली जिल्ह्यातील असून त्या 1995 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले असून त्यांच्याकडे एमबीएची पदवी देखील आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून केली होती. 1997 ते 1999 या काळात त्या कोल्हापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. यानंतर सिंधुदुर्ग, नागपूर या जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना प्रशासकीय सेवेचा जवळपास 27 वर्षांचा अनुभव आहे.  

हे ही वाचा : मुंबईची खबर : आता महापालिकेच्या रुग्णालयातही मिळणार आयव्हीएफ उपचार, लवकरच अंतिम निर्णय

मेट्रोवुमन म्हणून ओळख

2015 ते 2020 या काळात त्यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे. या कालावधीत त्यांची मेट्रो वुमन अशी ओळख तयार झाली. राज्यभरात गाजलेल्या आरे मेट्रो कार शेडच्या वादात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी मेट्रो प्रशासनाची भूमिका ठामपणे मांडली होती. याचमुळे मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख तयार झाली होती. यासोबतच मुंबईच्या अॅक्वा लाईनच्या विकासातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.