Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांमधील सध्याचा पाणीसाठा 17 मे 2027 पर्यंतच पुरेल असा अंदाज बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरातील 10 टक्के पाणीकपात मागे न घेता ती अशीच सुरू ठेवावी लागू शकते, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. महापालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीकपातीवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय केवळ सध्याचा साठा पाहून न घेता राखीव साठा, शासनस्तरावरील नियोजन आणि पुढील पावसाळ्यापर्यंतचे गणित लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
किती पाणीसाठा शिल्लक आहे?
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलैच्या सुरुवातीला मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांमध्ये केवळ 7 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. परंतु जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे 21 जुलैपर्यंत हा साठा 89 टक्क्यांपर्यंत पोहोचला आणि मुंबईवरील मोठे जलसंकट टळले. दुर्दैवाने, त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाणीसाठ्यात अवघी 8 टक्क्यांचीच भर पडली. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये एकूण 96.64 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी असून, 2025 मध्ये याच काळात 97.57 टक्के तर 2024 मध्ये 99.09 टक्के पाणीसाठा नोंदवला गेला होता.
हे ही वाचा : हातोडा, पक्कड, दोरी घेऊन तरुण नीलम गोऱ्हेंच्या बंगल्यात घुसला.., नेमकं काय घडलं?
एल निनोचं संकट
पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न होण्यामागे आणि पुढील आव्हानांमागे हवामान बदलाचे मुख्य कारण आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात 'एल निनो'चा (El Nino) प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एल निनोमुळे तापमान वाढून धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होईल, ज्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अपेक्षेपेक्षा लवकर खाली येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने 2026 च्या नैऋत्य मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज वर्तवला होता. याच कारणामुळे 15 मे रोजी धरणातील साठा 25 टक्क्यांपेक्षा खाली आल्यानंतर महापालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली होती.
हे ही वाचा : पतीपासून वेगळी झाली, शफीसोबत अफेअर; शेवटी मृतदेह तुकडे कालव्यात सापडले
बाष्पीभवनाचा वेग
मुंबई शहराला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी तुळशी, विहार, भातसा, तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मिडल वैतरणा या सात तलावांवर अवलंबून राहावे लागते. ही धरणे मुंबईच्या उपनगरांसह लगतच्या ठाणे, नाशिक आणि पालघर जिल्ह्यांत पसरलेली आहेत. धरणांमध्ये पाणीसाठा 96 टक्क्यांहून अधिक दिसत असला तरी आगामी उन्हाळा, बाष्पीभवनाचा वेग आणि पावसाचे अनिश्चित आगमन विचारात घेता पाण्याचा अपव्यय टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
ADVERTISEMENT












