सातारा : मुलाकडून चुकून हॅन्डब्रेक निघाल्याने अपघात, एकाच कुटुंबातील चार महिलांचा दुर्दैवी अंत

इम्तियाज मुजावर

09 May 2026 (अपडेटेड: 09 May 2026, 10:06 AM)

साताऱ्यातील कामथी गावात झालेल्या अपघातात एकाच घरातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे. चार दिवसांवर घरात लग्नकार्य होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Satara Accident

Satara Accident

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सातारा : मुलाकडून निघाला टेम्पोचा हॅन्डब्रेक

point

एकाच कुटुंबातील चार महिलांचा दुर्दैवी अंत

Satara Accident : साताऱ्यातील कामथी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उरमोडी धरणालगत असलेल्या या गावात आयशर टेम्पोचा एका मुलाकडून चुकून हॅन्डब्रेक निघाल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एका बालिकेचा मृत्यू झाला. या अपघाताने अडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लीलाबाई उत्तम अडागळे (वय 56), मालुबाई सीताराम अडागळे (50), कल्पना सागर आवळे (36), गार्गी सागर आवळे (वय 6) अशी त्यांची नावे आहेत. अन्य काही जखमी झाले आहेत. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.

हे वाचलं का?

चार दिवसांवर लग्नकार्य

कामथी येथील सीताराम अडागळे यांच्या कुटुंबातील नवीन गावठाणात (पुनर्वसित गावात) निमसोड (खटाव) या ठिकाणी चार दिवसांवर लग्नकार्य आहे. यासाठी घरातील साहित्य आणि जनावरे हलवण्याचे काम दोन दिवसांपासून काम सुरू होते.

हे ही वाचा : जालना : 'आमचा बदला पूर्ण झाला..' दोन अल्पवयीन मुलांनी तरुणाला भर चौकात संपवले, नेमकं कारण काय?

मुलाकडून हॅण्डब्रेक निघाला अन्..

शुक्रवारी (8 मे) रात्री सव्वादहाच्या दरम्यान कुटुंबातील सहा सदस्य आयशर टेम्पोत जनावरे भरत असताना केबिनमध्ये बसलेल्या मुलाकडून हॅन्ड ब्रेक निघाला व काही क्षणातच गाडी बांधाच्या कडेला असलेल्या उतारावरून थेट धरणाकडे गेली आणि पलटी झाली. यावेळी केबिनमध्ये बसलेल्या महिलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही.

हे ही वाचा : Pune: तुरूंगातून बाहेर आला आणि 5 दिवसातच हत्या, तरूणीसोबत 'नको ते' करणं बेतलं जीवावर!

जेसीबीच्या सहाय्याने काढले बाहेर

या अपघातात वाहनातील तीन महिला व एक बालिका जागेवरच दगावली. उर्वरित सदस्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना समजतात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ आणि कासारथळ येथील युवकांनी जेसीबीने गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले.