Pune: तुरूंगातून बाहेर आला आणि 5 दिवसातच हत्या, तरूणीसोबत 'नको ते' करणं बेतलं जीवावर!

मुंबई तक

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने जीवघेणा हल्ला करत तिच्या हत्येचा प्रयत्न केलेला, त्याच तरुणाची आता भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

murder, love, pune crime, pimpri chinchwad,  young man brutally killed, girlfriend, attack on girlfriend
प्रातिनिधिक फोटो
google news

पुणे: एकतर्फी प्रेमाच्या नकाराने सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, पाच महिन्यांपूर्वी प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाचीच आता भररस्त्यात चाकू आणि चॉपरने हत्या करण्यात आली. या थरारक हत्याकांडाने पिंपरी-चिंचवड परिसर हादरला आहे. मृत तरुण अवघ्या पाच दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आला होता.

मृत व्यक्तीचे नाव सुभान हमीद शेख असे आहे. सुभानला एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, तरुणीने त्याला वारंवार नकार दिला होता. या रागातून पाच महिन्यांपूर्वी सुभानने त्या तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली आणि तो जेलमध्ये होता. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. 

तरुणीच्या कुटुंबीयांना भीती होती की, जामिनावर आल्यानंतर सुभान पुन्हा मुलीला त्रास देईल किंवा हानी पोहोचवेल. त्यामुळे कुटुंबाने सुभानला “तिचा नाद सोड, अन्यथा परिणाम वाईट होतील” अशी स्पष्ट धमकी दिली होती. याच धमकीमुळे वाद अधिक चिघळला.

गुरुवारी रात्रीची घटना:

गुरुवारी (७ मे २०२६) रात्री साडे अकराच्या सुमारास काळेवाडी परिसरात सुभानवर अचानक दोघांनी हल्ला केला. आरोपींनी चाकू आणि चॉपरने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुभानला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. हल्ला इतका निर्घृण होता की, परिसरातील नागरिकांनी देखील घटनेच्या भीतीने खळबळ उडवली.

हे वाचलं का?