Maharashtra ssc result 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल बघण्याची आतुरता लागली आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाबाबत मोठी माहिती दिली आहे. मात्र, अद्यापही निकालाची तारीख जाहीर झाली नाही पण निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी आपला निकाल कसा बघावा याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्यावी. निकाल निकाल बघण्यासाठी mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in या लिंक वर जाऊन आपण निकाल बघू शकता. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपली वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. ज्यात आपल्या आईचे नाव, सीट नंबर, जन्मतारीख ही माहिती भरावी लागणार आहे. निकाल बघण्यासाठी पुढील माहिती लक्षात घ्या.
निकाल पाहण्यासाठी खालील माहिती घ्या जाणून
सुरूवातीला वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर होमपेज हा पर्याय निवडा
त्यानंतर होमपेज दिसू लागेल. जिथे आणखी एक पेज ओपन होईल. त्याच पेजवर वैयक्तिक माहिती भरावी. ज्यामध्ये सीट नंबर आणि आवश्यक असणारी माहिती भरून घ्यावी.
माहिती भरून झाल्यानंतर Submit वर क्लिक करा.
यानंतर आपल्या स्क्रिनवर मार्कशीट दिसू लागेल. त्यानंतर ती मार्कशीट मिळवण्यासाठी Download वर क्लिक करा.
त्यानंतर Submit वर क्लिक करा.
तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसू लागेल. त्यानंतर तुम्ही ती मार्कशीट डाऊनलोड करू शकता.
स्क्रिनवर दिसणाऱ्या मार्कशीटची आपण प्रिंटआऊटही काढू शकता.
दहावीच्या विद्यार्थ्यांची गतवर्षीची कामगिरी
दरम्यान, 2024 मध्ये महाराष्ट्र शिक्षण मंडळाने 27 मे रोजी निकाल जाहीर केला होता. ज्यात एकूण 15 लाख 60 हजार154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती. तर 14 लाख 84 हजार 431 विद्यार्थी पास झाले होते. ज्यात एकूण 95.81 चक्के विद्यार्थी पास झाले होते. दरम्यान, यंदाचा निकाल कसा लागेल याकडे अवघ्या नातेवाईकांचे लक्ष लागलेलं आहे,
ADVERTISEMENT
