बीड : सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा थरारक शेवट, नेमकं काय घडलं?

नाते आणि समाजमनाची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत थरारक आणि दुर्दैवी शेवट अंबाजोगाई येथे झाला आहे.

Beed News

Beed News

मुंबई तक

28 May 2026 (अपडेटेड: 28 May 2026, 12:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा थरारक शेवट

point

नेमकं काय घडलं?

Beed News, रोहिदास हातागळे : नाते आणि समाजमनाची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत थरारक आणि दुर्दैवी शेवट झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या खळबळजनक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी तेलंगणात

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील एका 40 वर्षीय व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी दुसरे लग्न केले. संसार सुरू असतानाच, पहिल्या पत्नीच्या मुलाचे आपल्या सावत्र आईशी प्रेमसंबंध जुळले. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी हे दोघेही घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले.

हे ही वाचा : सोलापूर : रीलस्टार- हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या, आता नवऱ्याची पोस्ट व्हायरल

भीती आणि नैराश्य

आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे फोन टॅप केला. पोलिसांनी तेलंगणा गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत, या भीतीपोटी आणि नैराश्यातून मुलाने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने रुगण्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, त्याची मृत्यूशी सुरू असलेली चार दिवसांची झुंज अपयशी ठरली आणि उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय, पण गावाकडे जीव गेला

प्रियकराच्या मृत्यूने धक्का

आपल्या प्रियकराच्या मृत्यूची बातमी समजताच सावत्र आईला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने शिरीषच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळताच डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परता दाखवत तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. 

हे ही वाचा : चांदणीच्या चेहऱ्यावर सपासप केले वार, शाहीदला काय आवडलं नाही?

सर्वांसमक्ष पंचनामा

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्वांसमक्ष पंचनामा केला. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस अत्यंत गांभीर्याने करत आहेत.