नाशिक : गेल्या महिनाभराच्या कालवाधीत मराठवाड्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. अनेक शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलंय. मात्र, दुसरीकडे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर नाशकात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील पीकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिर पेंडीला शेकडा 17 हजार 50 रुपये इतका भाव मिळालाय. त्यामुळे कोथिंबिरची पेंडी 170 रुपयांवर पोहोचली आहे. याबाबतची माहिती नाशकातील व्यापाऱ्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, राणेंच्या कट्टर विरोधकाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मेथीची पेंडी 70 रुपयांना, तर कांद्याची पात 40 रुपयांवर
नाशिक जिल्ह्यातील आभाळवाडी येथील शेतकऱ्याने आणलेल्या कोथिंबिरला सर्वात जास्त दर मिळालाय. गेल्या आठवड्यात नाशकात मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक मातीमोल झाले. मात्र, दुसरीकडे विजयादशमीच्या सण देखील तोंडावर आला होता. नाशकातील बाजार समित्यांमध्ये अनेक पीकांचं आवक कमी झाली होती. दरम्यान, कोथिंबिर देखील सहजासहजी मिळत नव्हती. त्यामुळे कोथिंबरचा भावाने उच्चांकी दर गाठल्याची चर्चा आहे. विजयादशमी दिवशी नाशकात कोथिंबिरचा पेंडिचा भाव 170 इतका होता, मेथीची पेंडी 70 रुपयांना होती. तर कांद्याची पात 40 रुपयांवर पोहोचली आहे.
नाशकातील शेतकरी राजा सुखावला, पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरच संकट कायम
दरम्यान, नाशिक बाजर समितीत एका व्यापाऱ्याने कोथिंबरचा माल खरेदी केलाय. त्याला चायना कोथिंबिरची पेंडी 170 रुपयांना मिळाली आहे, तर गावरान कोथिंबिरची पेंडी साधारणपणे 100 ते 150 रुपयांना खरेदी केल्याचं सांगितलं आहे. कोथिंबिरनंतर मेथीच्या पेंडीचे भाव देखील कडाडले आहेत. मेथीची पेंडी 70 रुपयांवर पोहोचली आहे, तर कांद्याच्या पातीचा भाव 40 रुपयांवर पोहोचलाय. त्यामुळे नाशकातील शेतकरी राजा सुखावलाय. मात्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरच संकट अजूनही कायम आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
