उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, राणेंच्या कट्टर विरोधकाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई तक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसलाय. कोकणातील आणखी एका नेत्याने साथ सोडली

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का

point

राणेंच्या कट्टर विरोधकाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात मोठी चाल खेळलीये. ठाकरेंचा कोकणातील आणखी नेता एकनाथ शिंदेंनी गळाला लावलाय. काही महिन्यापूर्वीच ठाकरे गटात आलेल्या राजन तेली आता शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजन तेली कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. मात्र, नंतरच्या काळात ते भाजपमध्ये गेले. नंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते. मात्र, आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजन तेली राणे कुटुंबियांचे कट्टर शत्रू मानले जातात. मात्र, आता निलेश राणे आणि राजन तेली एकाच पक्षात असणार आहेत. त्यामुळे कोकणातील राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : 'कोण कोणाशी युती करतो, याची चिंता नको त्याचा हिशोब आमच्याकडे..', शिंदेंचं थेट राज ठाकरेंनाही आव्हान?

ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण काय?

दरम्यान, ठाकरेंची साथ सोडण्याच्या कारण काय? याबाबत राजन तेली यांनी भाष्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काम करण्याची संधी मिळत नव्हती. शिवाय, संघटन बांधणीसाठी मी जबाबदारी सोपवण्याची मागणी केली. मात्र, माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं राजन तेली म्हणाले आहेत. 

राजन तेली कोण आहेत? 

राजन तेली यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1985 साली कणकवली महाविद्यालयात विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व करत केली. 1988 मध्ये ते कणकवलीतील शिवसेना शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. 1995 मध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष पद भूषविले. 1997 मध्ये त्यांच्यावर कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2005 मध्ये नारायण राणे यांच्यासह त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2007 साली ते विधान परिषदेचे आमदार झाले. 2012 मध्ये ते सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून निवडून आले. पुढे 2016 साली भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, 2024 मध्ये त्यांनी तब्बल 19 वर्षांनी ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी केली होती. मात्र, आता त्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp