Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे. काही ठिकाणी कोरडं, तर काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर कोकणात हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. अशातच 7 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: हनुमान जयंतीला मुलाचं अपहरण, 45 लाख रुपये खंडणीची मागणी, उंदीर मारण्याचं औषध देऊन गळा आवळून संपवलं
कोकण
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र
या विभागात पुणे, पुण्यातील घाटमाथा परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याच विभागात हवामान उष्ण राहिल असा अंदाज जारी करण्यात आला.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पत्नी तरुणासोबतच्या शारीरिक संबंधांना चटावली, पतीचा प्रायव्हेट पार्ट अर्धवट कापला अन्...
विदर्भ
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि गोंदिया या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अंदाज जारी केला नाही. तसेच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT











