नागपूर: मुलाचं अपहरण करत 45 लाख रुपये खंडणीची केली मागणी, उंदीर मारण्याचं औषध देत मुलाला संपवलं

Nagpur crime : नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हनुमान जयंती दिवशी मिरवणुकीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहण केले आणि नंतर त्याला उंदीर मारहण्याचे औषध दिले, पण तो बेशुद्ध पडला नाही. अखेर दगडाचे काळीज असणाऱ्या हल्लेखोरांनी मुलाची निर्घृण हत्या केली.

Nagpur crime

Nagpur crime

योगेश पांडे

06 Apr 2026 (अपडेटेड: 06 Apr 2026, 09:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

45 लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या मुलाचं अपहरण

point

नंतर उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्या...

point

हनुमान जयंती दिवशी भयंकर घडलं

Nagpur Crime : नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हनुमान जयंती दिवशी मिरवणुकीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केले आणि नंतर त्याला उंदीर मारहण्याचे औषध दिले, पण तो बेशुद्ध पडला नाही. अखेर हल्लेखोरांनी मुलाची निर्घृण हत्या केली. ही घटना नागपूर येथील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संबंधित प्रकरणातील मृताचे नाव अथर्व नानोरे (वय 14) असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नी तरुणासोबतच्या शारीरिक संबंधांना चटावली, पतीचा प्रायव्हेट पार्ट अर्धवट कापला अन्...

हनुमान जयंती दिवशी अल्पवयीन मुलाची केली हत्या

अथर्वचे वडील घाऊक हे भाजी विक्रेते म्हणून काम करतात. 2 ऑक्टोबर रोजी हनुमान जयंती दिवशी अथर्व मिरवणुकीत गेला असता, त्याचे अपहरण केले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, जय यादव, कुणाल साहू आणि आशिष साहू या तीन आरोपींनी पैशांच्या लोभापायी अथर्वचे अपहरण केले आणि काही तासांतच मुलाची हत्या केली. घडलेल्या माहितीनुसार, रात्री 10: 54 वाजता अथर्वला बहाण्याने सोबत नेण्यात आले, नंतर रात्री 11:30 च्या सुमारास एका गाडीत गळा आवळून त्याची हत्या केली. 

हे ही वाचा : पुणेकरांची प्रतिक्षा संपली, 33 वर्षांनंतर बाणेर-पाषाण लिंक रोड खुला होणार, वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार

45 लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या मुलाचं अपहरण, नंतर उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्या...

पोलिसांच्या एकूण तपासातून समोर आले की, तीन आरोपींना 45 लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या उद्देशाने अथर्व नानोरेचे अपहरण केले. अपहरणानंतर अथर्वला उंदीर मारण्याच्या गोळ्यांचा वास घेण्यास सांगितला, पण तरीही तो बेशुद्ध पडला नाही, अखेर आरोपींनी त्याची हत्या केली. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी तीन दिवस कसून तपास केला असता, त्याचा सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्सची माहिती मिळवली. संबंधित प्रकरणात घटनास्थळावरून जमा केलेल्या पुराव्यांच्या आधारे, तीन आरोपींना अटक केली आहे.