सोलापूर हादरलं! लेकरासाठी डायपर आणायला गेलेला बाप रक्ताच्या थारोळ्यात

Solapur crime : लेकरासाठी डायपर आणण्यासाठी गेलेला बापाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. ही घटना सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे, पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Solapur crime

Solapur crime

मुंबई तक

• 04:03 PM • 23 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

पोलिसांनी फोन उचलून कुटुंबीयांना सांगितली धक्कादायक घटना 

Solapur Crime : लेकरासाठी डायपर आणण्यासाठी गेलेला बापाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. ही घटना सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत व्यक्तीची सुफियान गुलाम रसूल शेख (वय 24) अशी ओळख समोर आलेली आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : विद्यार्थिनीला हॉटेलवर नेलं, भांगेत कुंकू भरलं अन् नको तेच.. अश्लील Video व्हायरल

नेमकं काय घडलं? 

सुफियान शेख हा फॅब्रिकेशनचे काम करत आपल्या कुटुंबाचं पोट भागवत होता. दीड वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता, तसेच त्याला एक लहान मुलं आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सफियान आपल्या मुलासाठी डायपर आणण्यासाठी गेला होता. मात्र, बराच वेळ उलटला तरीही सुफियान घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटचे सेक्युरिटी गार्ड रात्रीच्या वेळी परिसरात पाहणीसाठी फेरफटका मारण्यासाठी गेले असता, सुफियानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला होता. 

पोलिसांनी फोन उचलून कुटुंबीयांना सांगितली धक्कादायक घटना 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास केला. सुफियान परतलाच नसल्याने कुटुंबीय त्याला सतत फोन करत होते. पोलिसांनी फोन उचलून सुफियानचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. या प्रकरणाची बातमी समजताच कुटुंबाला मोठा हादरा बसला. 

हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि चंद्राच्या संघर्षामुळे व्यतिपात योगाची निर्मिती, 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ

सुफियान हा विजापूर रोड परिसरात कशासाठी गेला होता? त्याच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय? ही आत्महत्या आहे की घातपात? असे एक नाही,तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.