Astrology : सूर्य आणि चंद्राच्या संघर्षामुळे व्यतिपात योगाची निर्मिती, 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, मे 2026 मध्ये व्यतिपात योग नावाचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली खगोलीय संयोग निर्माण होणार आहे. हा योग सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे तयार होईल आणि त्याचे परिणाम सर्वच राशींवर होणार आहे.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, मे 2026 मध्ये व्यतिपात योग नावाचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली खगोलीय संयोग निर्माण होणार आहे. हा योग सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे तयार होईल आणि त्याचे परिणाम सर्वच राशींवर होणार आहे.

2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, मान्यतेनुसार, या योगातील ऊर्जा असंतुलित आणि संवेदनशील मानली जाते, ज्यामुळे मानसिक ताण, निर्णय घेण्यास विलंब आणि कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे हा काळ अगदीच सावधगिरीचा मानला जातो.

3/5
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत सावधानता बाळगण्याचा सल्ला देतो. याच काळात मोठी गुंतवणूक व्यवहार किंवा आर्थिक जोखीम टाळणे उत्तम राहणार आहे, तसेच संयम देखील राखावा.

4/5
सिंह
राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी विशेष सावधगिरी बाळगावी. याच काळात सहकारी आणि वरिष्ठांशी मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणाताही निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे.

5/5
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतो. याच काळात संवाद साधल्यानंतर त्याचाच चुकीचा अर्थ जाण्याची शक्यता असू शकते, ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळावा तसेच तणाव देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.









