Maharashtra Weather : राज्यात ठिकठिकाणी हवामानात बदल घडून येणार आहे. ज्यामध्ये मुंबई, पुणे आणि इतर काही शहरांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात झाली असता, राज्यातील बहुतांश विभागात हवामान विभागाने वातावरण कोरडं राहिल असा अंदाज वर्तवलेला आहे. अशातच आता नेमक्या हवामानाचा अंदाजाबाबत स्थानिक हवामान विभागाची (IMD) वेबसाइट तपासून घ्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाऱ्याच्या मेहुण्याची आत्महत्या, बलात्काराचा गुन्हा होता दाखल, हादरवणारी घटना
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. याच विभागातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केलेला आहे. तसेच तापमानात म्हणावा असा फारसा परिणाम जाणवलेला दिसून येत नाही.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागातील सर्व जिल्ह्यांत हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच तपमानात काही अंशी प्रमाणात बदल घडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा इशारा दिला आहे. या विभागात हवामान विभागाने तापमानात फारसा फरक जाणवणार नाही.
हे ही वाचा : कोल्हापूरच्या पुरुषावर पुण्यात अत्याचार, महिलेने गुंगीचं औषध देऊन डाव साधला अन्...
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केलेला नाही. तापमान वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











