Amravati Crime : अमरावतीच्या बडनेरा येथील जुन्या वस्तीत असलेल्या सावता मैदानावर एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. फुटाने विकणाऱ्या तरुणाची चाकूने सपासप वार करून शनिवारी उशिरा हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजू खोपकर (वय 27) असे आहे, तो बिडनेरा येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वाशिम : नवरा बायकोची जोरदार भांडणं, बायकोनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला अन् संसारच पाण्यात बुडाला..
या हत्येबाबत संताप व्यक्त केला जात आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह बडनेरा पोलीस ठाण्यात पोहोचून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डीसीपी गणेश शिंदे हे पथकासह घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली.
हत्येचं कारण आलं समोर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत असलेल्या ऋषी खोपकर आणि आरोपी रेल्वे गाड्यांमध्ये चणे आणि फुटाणे विकण्याचे काम करायचे. याचवरून अनेकदा दोघांमध्ये वाद देखील झाला होता. या दोघांमधील वादाचे कारण समोर आल्याने शनिवारी रात्री सावता मैदानात चारही आरोपींनी ऋषीला घेराव घालत मारहाण केली. नंतर चाकूने सपावर वार केले, यात आरोपींमध्ये एक प्रौढ आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, या हल्ल्यात ऋषीचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : नुकताच झाला बुध ग्रहाचा उदय, आता काही राशीतील लोकांना होणार मोठा फायदा
पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेनं घटनास्थळावरील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT











