लातूर : क्रीडा प्रशिक्षकाकडून चार मुलींसोबत भर मैदानावर नको ते कृत्य, तरुणींनी तक्रार देताच पोलिसांनी उचललं

Latur Crime : लातूर : क्रीडा प्रशिक्षकाकडून चार मुलींसोबत भर मैदानावर नको ते कृत्य, तरुणींनी तक्रार देताच पोलिसांनी उचललं

Latur Crime :

Latur Crime :

मुंबई तक

26 Nov 2025 (अपडेटेड: 26 Nov 2025, 11:19 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लातूर : क्रीडा प्रशिक्षकाकडून चार मुलींसोबत भर मैदानावर नको ते कृत्य,

point

तरुणींनी तक्रार देताच पोलिसांनी उचललं

Latur Crime : लातूर शहरातील एका संस्थेच्या मैदानावर खासगी क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या देविदास देवराव पाटील (वय 64, रा. लातूर) याने तीन अल्पवयीन मुलींसह एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींनी दिलेल्या जबाबांनंतर गांधी चौक पोलिसांनी पाटील याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तात्काळ अटक केली. मंगळवारी त्याला लातूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले.

हे वाचलं का?

पोलिसांच्या माहितीनुसार, पाटील हा लातूरमधील एका संस्थेच्या मैदानावर मुलींचे प्रशिक्षण घेत असे. प्रशिक्षणादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देतो, अशा आश्वासनांच्या आधारे तो मुलींना फूस लावत असे. त्यानंतर त्यांच्याशी अनुचित वर्तन करून विनयभंग केल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. महाविद्यालयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता, आणखी तीन अल्पवयीन मुलींनाही प्रशिक्षकाने त्रास दिल्याचे समोर आले.

हेही वाचा : मुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं पडलं महागात! ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली अन्... तरुणासोबत घडलं भयानक

घटना जानेवारी 2025 पासून 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पीडित मुलींच्या सविस्तर जबाबांनंतर सोमवारी गांधी चौक पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. मंगळवारी देविदास पाटीलला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र खरे यांच्या पथकाकडून सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी सांगितले.

या घटनेमुळे लातूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. प्रशिक्षणाच्या निमित्ताने विश्वासात घेऊन मुलींवर छळ झाल्याने पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी इतर कुणी पीडित मुली असतील तर पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अमरावती : लग्न लागलं अन् दोन तासात नवरदेवाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबियांना सावरणेही झाले कठीण

    follow whatsapp