Maharashtra Weather : राज्यात हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहणार असून वातावरण ढगाळ राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी थंडीची लाट पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान हे 3-4 अंशाने घसरणार असल्याची शक्यता आहे. तसेच पहाटे आणि रात्री गारठा वाढण्याची शक्यता आहे. अशातच 19 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड : घोटाळेबाज कुटे दाम्पत्याला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला दुचाकीस्वारांनी दिली धडक, अपघातात एकाचा दुर्देवी अंत
कोकण :
कोकण विभागात मुख्यत्वे ढगाळ वातावरण राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागात हलका थंडावा जाणवणार आहे. मुंबईत हलके धुक्याची शक्यता असून दृश्यमानता काहीवेळ कमी होईल.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्राचा दिवसा उबदार आणि रात्री थंड हवामानाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुण्यात कमाल तापमान हे 20-31 अंश तर किमान तापमान हे 12-15 अंश राहण्याची अधिक शक्यता आहे.
मराठवाडा विभाग : '
मराठवाडा विभागात पहाटे धुक्याची चादर पसरणार आहे. तर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, यामुळे थंडी होण्यास सुरुवात झाली.
हे ही वाचा : 15 दिवसांपूर्वी पत्नीचं निधन, ठाकरेंचा शिलेदार खचला नाही, 30 वर्षांच्या संघर्षानंतर शिवसेनेने मुंबईतील 'हा' वार्ड जिंकला
विदर्भ :
विदर्भात थंडीची लाट सर्वाधिक तीव्र असेल, तसेच सकाळी दाट धुके आणि दिवसा उबदार वातावरणाचा अंदाज आहे. नागपूरसारख्या शहरांत पहाटे गारठा जाणवण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे वाहतूक आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











