Maharashtra Rain Alert : आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आहे. अशाप्रकारे दिवाळीला आता सुरूवात झाली आहे पण, राज्यातील काही जिल्ह्यांवर अजूनही पावसाचं सावट आहे. हे पाहता ऐन दिवाळीत पाऊस हजेरी लावणार का? याची भीती अनेकांना आहे. चला तर मग आज (28 ऑक्टोबर 2024) पावसाचा अंदाज जाणून घेऊया. (maharashtra weather forecast update Today 28 october rain alert in diwali to these districts IMD report mumbai pune)
ADVERTISEMENT
पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिवाळीच्या धुमधडाक्यात 'या' जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह, हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच विदर्भासह मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी येथे आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात काही दिवस ढगाळ वातावरण असेल. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. आज येथील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
मुंबईत हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत गेल्या 8 ते 10 दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. आता यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. आज मुंबईचे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. तर, काही ठिकाणी पाऊस हजेरी लावेल.
ADVERTISEMENT
