Groom And Bride Viral News : नवरा लग्नाची वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्या. त्यानंतर नवरीचे कुटुंबीय बोलले, काहीतरी सामान विसरलो आहोत, ते घेऊन यायचंय. त्यांच्यासोबत नवरीही निघून गेली. नवरा आणि त्याचे कुंटुंबीय रात्रभर वाट पाहत राहिले. पण सकाळी नवऱ्याला माहित झालं की, त्याची पत्नी चोर होती. ती सर्व दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली. तेव्हा नवऱ्याने त्याच्या आईला सांगितलं की, माझी बायको रात्रीच पळून गेली आहे..नेमकं घडलं तरी काय? जाणून घ्या..
ADVERTISEMENT
मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. येथे राहणाऱ्या नान सिंगचं लग्न जुळत नव्हतं. याच कारणामुळे नवऱ्याचा मोठा भाऊ वेस्ता कलेश नैराश्यात होता. एक दिवस वेस्ता एजंट कैलाश चौहानला भेटला. कैलासने त्याच्यासाठी एक मुलगी शोधली होती. आसमा असं या तरुणीचं नाव होतं.
सामान विसरलो असं सांगत फरार झाले अन्..
लग्न झाल्यानंतर त्यांनी सामान विसरल्याचं सांगत पळ काढला. या लग्नात आसमाचा पती तिचा भाऊ बनला होता आणि विदाईच्या वेळी भावुक झाला होता. तर इलाम सिंहने वडिलांची भूमिका घेतली होती. या लग्नासाठी हिरालालने त्याचं घर उपलब्ध करून दिलं होतं.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: प्रवाशांनो! जिभेला बसणार महागाईचा चटका..'या' रल्वे स्टेशनवर वडापावचे दर वाढले
खरा नवरा बनला भाऊ..
लग्नाच्या नावावर चोरी करणाऱ्या या आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पाच जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आसमा, कैलाश चौहान, इस्लाम सिंह बर्डे, हीरालाल बर्डे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी म्हटलंय की, या गँगला कमी वेळात श्रीमंत व्हायचं होतं. या आरोपींनी अन्य कोणत्या ठिकाणी चोरी केली आहे, याचाही तपास केला जात आहे.
या ठिकाणीही पत्नीने दिला पतीला धोका..
मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्येही एक खळबळजनक घटना घडली. पत्नीने धोका दिला म्हणून पतीने नैराश्यात जाऊन स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पतीन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण पीडित व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं गेलं. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने टोकाचं पाऊल उचललं, असं त्या व्यक्तीने कुटुंबियांना सांगितलं.
हे ही वाचा >> Konkan Rain: मालवण, कुडाळमध्ये पूर.. सिंधुदुर्गातील पुराचे हे Video पाहून भरेल धडकी
ADVERTISEMENT
