Govt Job: संगीत क्षेत्रात आवड? मग Indian Navy 'या' सरकारी पदांसाठी करा अप्लाय...

भारतीय नौदल (Indian Navy) कडून अग्निवीर एमआर म्यूजिशियन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Indian Navy 'या' सरकारी पदांसाठी करा अप्लाय...

Indian Navy 'या' सरकारी पदांसाठी करा अप्लाय...

मुंबई तक

• 12:38 PM • 04 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय नौदलाकडून नव्या पदांसाठी भरती

point

संगीताची जाण असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Indian Navy Recruitment: संगीत क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी देशाची सेवा करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदल (Indian Navy) कडून अग्निवीर एमआर म्यूजिशियन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर झालं असून अर्जाची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. अर्जाची प्रक्रिया सुरू होताच इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

पात्रता

भारतीय नौदलच्या या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून किमान 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच या भरतीमध्ये अविवाहित महिला आणि अविवाहित पुरुष उमेदवारच पात्र ठरतील. परीक्षार्थींना नामांकनासाठी 'अविवाहित' असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागणार आहे. भारतीय नौदलातील या पदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात अग्निवीरांना लग्न करण्याची परवानगीही दिली जाणार नाही.

हे ही वाचा: Personal Finance: पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्किम दर महिन्याला मिळवा 9250 रुपये!

तसेच शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, उमेदवारांना संगीताची जाण आणि त्यात प्राविण्य प्राप्त असणं अनिवार्य आहे. म्हणजेच लय, सुर आणि अचूक पद्धतीने गाणे गाण्याची क्षमता उमेदवारामध्ये असावी. तसेच उमेदवाराकडे भारतीय किंवा परदेशी कोणत्याही वाद्यावर प्रत्यक्ष व्यावहारिक कौशल्य देखील असले पाहिजे. जसे की, कीबोर्ड, स्ट्रिंग, विंग इन्स्ट्रुमेंट्स, ड्रम किट अशा प्रकारच्या वाद्यांमध्ये कौशल्य असणे आवश्यक आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशनमधून पात्रतेशी संबंधित माहिती तपासू शकतात.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचा जन्म 1 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 दरम्यान असावा. 

हे ही वाचा: 'राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं बघवत नाही..', मेळाव्या आधी राऊतांनी साधला निशाणा पण टार्गेटवर नेमकं कोण?

किती मिळेल पगार? 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपये मासिक वेतन देण्यात येईल. या पदासाठी अर्जाची प्रक्रिया 5 जुलै रोजी सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार www.joinindiannavy.gov.in या नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2025 असून या तारखेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. 


 

    follow whatsapp