Maharashtra Weather: पुणे, साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट, पाहा आज कुठे-कुठे कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Update: पुणे आणि सातारा जिल्हा आणि विशेषतः घाट परिसरासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या याशिवाय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कसं असेल हवामान.

Maharashtra Weather (फोटो सौजन्य: Grok)

Maharashtra Weather (फोटो सौजन्य: Grok)

मुंबई तक

• 11:31 AM • 04 Jul 2025

follow google news

मुंबई: भारतीय हवामान विभाग (IMD) अंदाजानुसार,  4 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरसाठी ग्रीन तर रायगड, रत्नागिरी, आणि पुणे यांसारख्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे वाचलं का?

कोकण आणि मुंबई: मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना 4 जुलै रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाला कारणीभूत ठरत आहेत.

हे ही वाचा>> मुंबईत मुसळधार पाऊस घालणार धुमाकूळ! समुद्राच्या लाटाही खवळणार..रेल्वे सेवेवर होणार परिणाम?

पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रातील पुणे, साताऱ्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे घाटमाथ्यावरील आणि घाटाखालील वस्ती असणाऱ्या गावातील नागरिकांना सावधगिरी इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मराठवाडा: मध्यम पावसाची शक्यता

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची आहे. काही भागात पावसाचा जोर कमी असला तरी, स्थानिक नद्या आणि नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत.

हे ही वाचा>> चिमुकल्यांनो जरा स्वत:ला सांभाळा.. सरकारचं लवकरच 'याकडे' लक्ष जाईल!

स्थानिक प्रशासन आणि नागरिकांसाठी सूचना

मुंबई आणि कोकण: मुंबई महानगरपालिका (BMC) आणि स्थानिक प्रशासनाने पाणी साचण्याच्या ठिकाणांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

हवामान खात्याने नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडणं टाळावं आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे

हवामान खात्याने 4 ते 8 जुलै 2025 पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी होऊ शकते, परंतु तुरळक सरींची शक्यता कायम आहे.

    follow whatsapp