Woman Shocking Viral News :मध्यप्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं सर्वांनाच हादरा बसला आहे. येथील एका महिलेच्या काकानं तिचा सौदा करून टाकला. नराधमाने एका अज्ञात व्यक्तीसोबत दीड लाख रुपयांमध्ये पुतणीचा सौदा केला. त्या व्यक्तीने महिलेशी लग्न केलं. काकानंतर महिलेच्या पतीनेही तिच्यावर अत्याचार केला. तिला दुसऱ्या पुरुषांसोबत झोपायला मजबूर केलं.
ADVERTISEMENT
ही धक्कादायक घटना टीकमगढमध्ये घडली. छत्तीसगढमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेनं आरोप केला आहे की, काकाने दीड लाख रुपयांचा तिचा सौदा केला. लग्नानंतर पतीने वेश्या व्यवसायात ढकललं. बलरामपूर जिल्ह्यात राहणाऱ्या महिलेनं पती राजेश घोषवर आरोप केले आहेत की, तो तिला जबरदस्ती वेश्या व्यवसाय करायला सांगायचा. तसच मारहाणही करायचा. वैश्या व्यवसाय करायला सांगून पती माझ्याकडून पैसै कमवून घ्यायचा. पतीच्या जाचाला कंटाळून महिलेनं तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा >> वाल्मिक कराडच्या समर्थकाचं घृणास्पद कृत्य! मतिमंद मुलीवर अत्याचार अन्...
काकाने पुतणीचा केला होता सौदा..
पोलिसांना पतीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचं म्हणणं आहे की, काका रामजनकने विजय घोष या व्यक्तीच्या माध्यमातून राजेश घोषला दीड लाख रुपयांमध्ये विकलं होतं. विजय घोष खैराई येथील रहिवासी आहे. ती महिला विजय घोषसोबत त्याच्या गावात राहायची. काही दिवस सर्व काही ठीक होत. पण नंतर महिलेला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकललं. त्यानंतर महिलेला इंदौर आणि ग्वालियरलाही नेलं.
हे ही वाचा >>मुंबईची खबर: प्रवाशांनो! जिभेला बसणार महागाईचा चटका..'या' रल्वे स्टेशनवर वडापावचे दर वाढले
पती महिलेकडून हिसकावून घ्यायचा पैसे
पीडित महिलेचं म्हणणं आहे की, या व्यवसायात मिळणारे सर्व पैसे पती तिच्याकडून हिसकावून घ्यायचा. तसच तिला मारहाणही करायचा. पोलीस अधिकारी उपेंद्र छारी यांचं म्हणणं आहे की, महिलेच्या तक्रारीनुसार पती विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून पुरावे मिळाल्यावर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
ADVERTISEMENT
