Maharashtra Weather : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे. विशेषत:ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी, मान्सूनच्या हालचाली पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यातील दौंड तालुक्यात दोन गटात तुफान राडा, पोलिसांचा फौजफाटा तैनात, एकमेकांच्या घरावर दगडफेक
कोकण:
कोकण भागात विशेषत: मुंबई, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असेल, असा हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तर दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने स्थानिक मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्र:
पुणे, कोल्हापूर, सातारा, आणि सांगली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. तर पुण्यात 2 ऑगस्ट रोजी दुपारनंतर हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर, विशेषतः महाबळेश्वर, लोणावळा, आणि माथेरान येथे जोरदार पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. तर राज्यातील कमाल 29 डिग्री सेल्सियस ते किमान 23 डिग्री सेल्सियस तापमानाची हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा:
औरंगाबाद, जालना, परभणी, आणि बीड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भ:
नागपूर, अमरावती, वर्धा, आणि चंद्रपूर येथे 2 ऑगस्ट रोजी तुरळक पावसाचा अंदाज आहे. काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तर, हवामान विभागाने कमाल 35 डिग्री सेल्सियस, किमान 26 डिग्री सेल्सियस तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, आणि चंद्रपूर येथे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा : स्वच्छता विभागाचा प्रताप! पाणी समजून शिपायाने वरिष्ठ अधिकाऱ्याला पाजली लघवी, नेमकं काय घडलं?
मध्य महाराष्ट्र :
नाशिक, धुळे, जळगाव, आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे. तापमानात किंचित वाढ नोंदवली जाऊ शकते अशी शक्यता आहे. तर, तापमानाचा विचार केल्यास 32 डिग्री सेल्सियस ते किमान 23 डिग्री सेल्सियस तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
