Govt Job: बँकेत क्लर्क पदावर नोकरीची स्वप्नं पाहताय? मग 'ही' संधी सोडू नका... आत्ताच करा अप्लाय

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून लिपिक पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे.

बँकेत क्लर्क पदावर नोकरीची स्वप्नं पाहताय? मग ही संधी सोडू नका...

बँकेत क्लर्क पदावर नोकरीची स्वप्नं पाहताय? मग ही संधी सोडू नका...

मुंबई तक

• 01:38 PM • 01 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

IBPS कडून नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर

point

सरकारी बँकेत क्लर्क पदासाठी 10277 उमेदवारांची नियुक्ती

Govt Job: बँकेत सरकारी नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून लिपिक पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. तसेच, या भरतीअंतर्गत रिक्त पदांसाठी एकूण 10277 योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. 

हे वाचलं का?

आवश्यक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतातून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयामध्ये पदवीची डिग्री प्राप्त करणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराचं किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

हे ही वाचा: कोयता-सत्तुरने हल्ला! व्हिडीओ व्हायरल केल्याचा जाब विचारला अन् मित्राची बोटंच छाटली... बीडमधील धक्कादायक प्रकार

अर्ज करण्यासाठी शुल्क

बँकेत क्लर्क पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावं लागेल. एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवार आणि अपंग उमेदवारांसाठी 175 रुपये अर्ज शुल्क आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येतील. यामधील पूर्व परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि क्वांटिटेव्ह अॅप्टिट्यूड या विषयांवर आधारित 200 गुणांसाठी 150 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात येईल. 

हे ही वाचा: 6 व्या मजल्यावरुन दिला धक्का; फाटलेले कपडे अन्... प्रेयसीला संपवण्यामागे नेमकं कारण काय?

कसा कराल अर्ज?

1. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम  ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. यानंतर वेबसाइटच्या होमपेजवरील आयबीपीएस अप्लाय लिंकवर क्लिक करा. 
3. त्यानंतर विचारण्यात आलेली आवश्यक माहिती भरा. 
4. माहिती भरल्यानंतर स्कॅन केलेले डॉक्यूमेंट्स, फोटो आणि सही अपलोड करा. 
5. डॉक्यूमेंट्स अपलोड केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. 
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा. 

    follow whatsapp