आधी पतीचा मृत्यू अन् नंतर कमी वय असलेल्या तरुणासोबत फरार... दोन मुलांच्या आईने 'असं' का केलं?

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात आपल्या पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई असलेली महिला तिच्यापेक्षा लहान असलेल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप आहे.

आधी पतीचा मृत्यू अन् नंतर कमी वय असलेल्या तरुणासोबत फरार...

आधी पतीचा मृत्यू अन् नंतर कमी वय असलेल्या तरुणासोबत फरार...

मुंबई तक

• 05:17 PM • 01 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीच्या मृत्यूनंतर गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध

point

दोन मुलांची आई प्रियकरासोबत गेली पळून

point

पीडित मुलाने घेतली पोलिसात धाव आणि सगळं प्रकरण सांगितलं

Crime News: उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई असलेली महिला तिच्यापेक्षा लहान असलेल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर सुमन नावाची महिला घरातून 3.5 लाख रुपये रोख रक्कम आणि घरातील दागिने घेऊन पळून गेल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, महिलेचा 17 वर्षीय मुलगा मनीष वर्मा याने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. 

हे वाचलं का?

पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध 

हे प्रकरण गंगोह कोतवाली परिसरातील असून संबंधित महिला 25 जुलैपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. मनीषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या आईचे मुझफ्फरनगर येथील अनुज भाटी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. नुकतीच ती रिहाना, शहजादी आणि नूरजहाँ नावाच्या तिच्या मैत्रिणींसोबत पंजाबला गेली आणि तिथून ती अनुजसोबत पळून गेली.

हे ही वाचा: मानवी हाडं, लाल ब्लाउजचा तुकडा आणि ATM कार्ड... मास्क मॅनने सांगितलं शेकडो मृतदेहांचं 'ते' रहस्य!

महिलेच्या मैत्रिणींना मुलांना धमकावलं अन्...

आईच्या त्या मैत्रिणींना केवळ धमकावलंच नाही तर त्याला मारहाणही केल्याचा आरोप मनीषने केला. मनीषच्या म्हणण्यानुसार, आपल्या आईच्या मैत्रिणी शेतकरी संघटनेशी जोडलेल्या असल्यामुळे त्यांच्याविरोधात कोणीच काहीही करू शकत नाही. याव्यतिरिक्त, मनीषच्या आईने घरातील सर्व संपत्ती विकली असून तिच्या प्रियकराचा वडिलांची जमीन आणि इतर मालमत्ता हडप करण्याचा प्लॅन असल्याचा दावा पीडित मुलाने केला. सध्या, मनीष आणि त्याचा मोठा भाऊ एकटे पडले असून त्या दोघांना वारंवार धमक्या येत आहेत.

हे ही वाचा:  Impact Feature: मिर्ची योद्धा उपक्रम: पुण्यातील टाकाऊ कचऱ्याचं टिकाऊ गोष्टीत रूपांतर, 100 संगणक डोनेट आणि 40 हून अधिक रिसायकल बेंचेस

मनीषने प्रकरणाबद्दल पोलिसांना माहिती देताना सांगितलं की या घटनेबद्दल पोलिसांना काहीही सांगितल्यास रेहाना, नूरजहां आणि शहजादीने खोट्या केसमध्ये अडकवण्याची किंवा जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित मुलाच्या मते, पोलिसांना सर्व माहिती देऊन सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पीडितेच्या मुलाने त्याची आई आणि तिच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्याला न्याय मिळेल. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 
 

    follow whatsapp