Impact Feature: मिर्ची योद्धा उपक्रम: पुण्यातील टाकाऊ कचऱ्याचं टिकाऊ गोष्टीत रूपांतर, 100 संगणक डोनेट आणि 40 हून अधिक रिसायकल बेंचेस
मिर्ची योद्धा उपक्रमाने पुण्यातील टाकाऊ कचऱ्याचं टिकाऊ गोष्टीत रूपांतर केले. यावेळी 100 संगणक डोनेट करण्यात आले असून 40 हून अधिक रिसायकल बेंचेस बसविण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

पुणे: पर्यावरण सस्टेनेबिलिटी आणि कम्युनिटी इम्पॉवरमेंट च्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) आणि स्वयंसेवी संस्था पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या सहकार्याने मिर्चीने ग्रीन योद्धा मोहिम राबवली – पुण्यातील वाखाणण्याजोग्या प्रतिसादात पूर्ण ही केली.
ही मोहिम युनायटेड नेशन्सच्या २०२५ च्या – “प्लास्टिक प्रदूषणावर मात करा” – या थीमशी सुसंगत होती. ज्यात प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग, कलेक्शन ड्राइव आणि शहरभर जनजागृती उपक्रम यावर फोकस होता. मोहिमेचा शेवट दोन महत्वाच्या गोष्टींनी झाला.
• मोहिमेदरम्यान जमा केलेल्या रिसायकल्ड प्लास्टिकपासून 40 पेक्षा अधिक सार्वजनिक बाकडे बसविण्यात आले.
• जमा केलेल्या ई-कचऱ्याच्या रिफर्बिश आणि रिसायकल्ड इ-वेस्टपासून तयार केलेले 100 संगणक शहरातील दुर्लक्षित शाळांना दान करण्यात आले.
जे एका प्लास्टिक जमा करणं आणि वागणुकीतील बदलाच्या मोहिमेसारखं सुरु झालं, ते एका सर्क्युलर इकॉनॉमीचा पुरावा ठरलं. हे बाकडे, जे आता सार्वजनिक बागांमध्ये आणि शाळांमध्ये बसवले आहेत, पर्यावरणीय जबाबदारी आणि नागरिकांनी पुढाकार घेतलेली कृती याचं कायमचं प्रतीक बनली आहेत.










