फाटलेल्या ब्लाऊजचा तुकडा अन् शेकडो महिलांचे मृतदेह, 'या' देवस्थानच्या कर्मचाऱ्याने अवघा देश टाकलाय हादरवून!
कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिरात 19 वर्षे स्वच्छता कामगार म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने स्वत:च्या हातांनी शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा केला. हा सफाई कर्मचारी नेमका आहे तरी कोण? हा प्रश्न डोके वर काढत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धर्मस्थळाच्या मंदिरात पुरलेल्या मृतदेहांचं रहस्य
मास्क मॅनने केला शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा
Crime News: कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिरात 19 वर्षे स्वच्छता कामगार म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने 3 जुलै 2025 रोजी न्यायाधीशांसमोर आपला जबाब नोंदवला. स्वत:च्या हातांनी शेकडो मृतदेह पुरल्याचा त्या सफाई कर्मचाऱ्याने दावा केला. यातील बरेच मृतदेह महिला आणि मुलींचे होते. त्यांच्यावर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. हा सफाई कर्मचारी नेमका आहे तरी कोण? हा प्रश्न डोके वर काढत आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्याने काय सांगितलं?
स्वच्छता कर्मचाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे की तो 1995 ते 2014 पर्यंत धर्मस्थळ मंदिर प्रशासनासाठी काम करत होता. तसेच 1998 ते 2014 दरम्यान त्याला शेकडो मृतदेह पुरण्यास किंवा ते जाळून टाकण्यास भाग पाडण्यात आलं होतं. आता या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून मृतदेह पुरल्याच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्या ठिकाणांवरून अशा काही गोष्टी सापडल्या, ज्यामुळे पोलीस देखील चकित झाले.
पहिल्या दिवशीच्या खोदकामात काय मिळालं?
29 जुलै 2025 (मंगळवार) रोजी नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावरील साइट नंबर 1 वर खोदकाम करण्यात आलं. दरम्यान, प्रकरणातील सफाई कामगाराची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून त्या मास्क घातलेल्या कर्मचाऱ्याने अशा 13 ठिकाणांची माहिती एसआयटीला दिली आणि त्या ठिकाणी मृतदेह पुरल्याचा दावा केला. पहिल्या दिवशी साइट नंबर 1 वर जवळपास 6 तास खोदकाम करण्यात आलं. कामगारांनी 15 फूट खोल खड्डा खणला परंतु त्यांना मृतदेह, सांगाडा किंवा मानवी हाडं असं काहीच सापडलं नाही.
काहीच संशयास्पद हाती लागलं नाही...
30 जुलै 2025 (बुधवार) रोजी एसआयटीने साइट नंबर 2, 3, 4 आणि 5 या चार नवीन ठिकाणी खोदकाम सुरू केलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12 ते 15 फूट खोल खड्डे खणण्यात आले. साइट क्रमांक 3, 4 आणि 5 वर सुद्धा सांगाडा किंवा मृतदेह असं संशयास्पद काहीच सापडलं नाही. परंतु साइट नंबर 2 वर सापडलेल्या गोष्टींमुळे तपासाला वेगळंच वळण मिळालं.










