Maharashtra Weather : राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजाबाबत सविस्तर आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 7 जूलै रोजी हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये भारतीय हवमान विभागाच्या (IMD) नुसार, उपलब्ध महितीच्या आधारे हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : MMRDA च्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा! गरिब कुटुंब आले रस्त्यावर, 'त्या' महिलेचा असा झाला पर्दाफाश
मुंबई आणि कोकण मान्सूनस्थिती
मुंबई आणि कोकणभागातील हवमान हे ढगाळ राहिल. तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस हजेरी लावेल. यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने, मुंबई, पालघर, दादर, रायगड आणि रत्नागिरीत येलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे आणि मध्य महाराष्ट्र मान्सून स्थिती
पुणे आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवमानाचे वातावरण असेल. सातारा, सोलापूर आणि सांगलीत 120 मिमीपर्यंत पावसाचा जोर असेल.
शेतीसाठी पाण्याचा साठा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र पावसाची स्थिती
खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये पावसाची तीव्रता कमी राहील.
शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा आणि संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात. मुसळधार पावसामुळे, मुंबई, पुणे आणि इतर काही शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : पुणे हादरलं! "ए पप्पी दे तुला..." 73 वर्षीय वृद्धाने तरुणीवर केला विनयभंग
भारतीय हवमान विभागाने 7 जुलै रोजी राज्यातील अनेक भागांसाठी मान्सून सक्रिय असेल असाअंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मान्सूनची स्थिती चांगलीच असेल, असा हवमान विभागाने अंदाज वर्तवला होता.
ADVERTISEMENT
