Maharashtrea Weather : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरी राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान सरासरीच्या तुलनेत काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 6 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची परिस्थिती असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अशतच आता 6 नोव्हेंबर रोजी हवामानाची एकूण परिस्थिती ही नेमकी कशी असेल जाणून घ्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे : 'तुला संसार जमत नाही, तुझे डोळे बारीक आहेत', सूनेला सासरच्यांनी सतत हिणवलं, अखेर पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
कोकण विभाग :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तसेच पालघरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात कोरडं हवामानाचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाची परिस्थिती दर्शवली आहे. तसेच नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
हे ही वाचा : सॉफ्टवेअर इंजिनिअर OYO हॉटेलमध्ये आढळला 'नको त्या' अवस्थेत, कुटुंबीयांचा धक्कादायक दावा म्हणाले, 'आमचा मुलगा...'
विदर्भ विभाग :
राज्यातील विदर्भ विभागात हवामान विभागाने बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ,अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











