पुणे : 'तुला संसार जमत नाही, तुझे डोळे बारीक आहेत', सूनेला सासरच्यांनी सतत हिणवलं, अखेर पीडितेनं उचललं टोकाचं पाऊल
Pune crime : पुण्यातील कोंढवा परिसरात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेनं फॅनला ओढणी बांधून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तुम्ही हिचं लग्न का लावून दिलं? पतीचा पीडितेच्या कुटुंबाला सवाल
पतीचे तिच्या अंगावरील दागिने काढून नेले
Pune Crime : पुण्यातील कोंढवा परिसरात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेनं फॅनला ओढणी बांधून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती, सासू, दीर आणि नणंदेचा या प्रकरणात समावेश आहे. अशातच आता कोंढवा पोलिसांनी चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणात आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव दिशा निलेश शहा (वय 25) असे आहे. तसेच पोलिसांनी तपास केल्यानंतर इतरांचीही नावे समोर आली आहेत.
हे ही वाचा : सॉफ्टवेअर इंजिनिअरची OYO हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या, कुटुंबीयांचा धक्कादायक दावा म्हणाले, 'आमचा मुलगा...'
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत हितश्री संदेश शहा (वय 57) यांनी या प्रकरणाबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलीसांनी पती निलेश शहा, सासु संगीता शहा, दीर प्रशांत शहा आणि नणंद ममता व्होरा यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा यांचा निलेश दिलीप शहा यांच्यासोबत जैन समाजाच्या रुढी आणि परंपरेने 20 डिसेंबर 2024 मध्ये विवाह झाला होता. निलेश शहा हा खासगी नोकरी करत होता. त्याने विवाह झाल्यानंतर दिशा हिला नोकरी सोडण्यास जबरदस्ती केली. विवाहानंतर सर्वचजण तिला त्रास देत होते. तु कामात अगदीच धीमी आहेस, तुला संसारच जमत नाही. तुझे डोळे खूपच छोटे आहेत, असे बोलून तिला अनेकदा मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
तुम्ही हिचं लग्न का लावून दिलं? पतीचा पीडितेच्या कुटुंबाला सवाल
तिने बनवलेला स्वयंपाक कोणीही खात नव्हते, यामुळे तिचे मानसिक संतुलन आणखीच बिघडून गेले होते. 29 सप्टेंबर रोजी पती निलेश शहा , संगीता शहा, ममता व्होरा यांनी दिशाला आपल्यासोबत घेतलं आणि माहेरी आणलं. ममता व्होरा फिर्याद दाखल केलेल्या माहेरच्या मंडळींना म्हणाली की, तुम्ही हिचं लग्न का लावून दिलं? त्यानंतर पीडितेचा पती निलेश म्हणाला की, तिला संसार करता येणार नाही, असं सांगून सासरचे मंडळी तिथून निघून गेले.










