Maharashtra Weather : कोकणात उष्ण आणि दमट हवामान, कोणत्या जिल्ह्याला बसणार उन्हाचे चटके? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई तक

• 07:00 AM • 08 Mar 2025

Maharashtra Weather Update Today :  मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेच्या झळा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: कोकण विभागात तापमानाचा पारा वाढत आहे.

8 March 2025 Maharashtra Weather

8 March 2025 Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील आजचं तापमान काय?

point

कोणत्या जिल्ह्यांत पसरणार उष्णतेची लाट?

point

भारतीय हवामान विभागाने दिला इशारा

Maharashtra Weather Update Today :  मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेच्या झळा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: कोकण विभागात तापमानाचा पारा वाढत असून पुढील काही दिवस या ठिकाणी उष्ण वातावरण असण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्या ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे, तिथे राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे, असं आवाहानही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, आज 8 मार्च 2025 ला  राज्यातील कोणत्या जिल्ह्यात तापमानाची परिस्थिती काय असेल, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

हे वाचलं का?

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात काल शुक्रवारी कोरड्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज शनिवारीही पालघरमध्ये कोरडं हवामान असणार आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता आहे.

राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये असेल कोरडं वातावरण

हे ही वाचा >> Pune Police : पुण्यात 'खाकी'लाही भाईगिरीचा नाद? पोलिसाचं गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन

तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव, अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात कोरडं वातावरण असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh: तुमच्या पायखालची जमीन हादरून जाईल, संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तापमान 10 ते 12 अंश सेल्सियसने घसरल्याची नोंद गुरुवारी करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी मुंबईत कुलाबा परिसरात 22.5, सांताक्रूझमध्ये 18.6 अंश सेल्सियसची किमान तापमानाची नोंद झाली. तसच कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला होता.