Maharashtra Weather : पावसाचा वेग संथ, पुढील काही तास महत्त्वाचे

मुंबई तक

• 05:00 AM • 08 Sep 2026

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग अगदीच मंदावला आहे. दरवर्षीच्या तुलनेत 2026 मध्ये पावसाची तीव्रता ही अगदीच कमी जाणवते. अशातच जाणून घेऊयात 8 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

Maharashtra Weather (AI Photo)

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पावसाचा वेग अगदीच मंदावला

point

दरवर्षीच्या तुलनेत 2026 मध्ये पावसाची तीव्रता कमी

point

जाणून घेऊयात 8 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग अगदीच मंदावला आहे. काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत 2026 मध्ये पावसाची तीव्रता ही अगदीच कमी जाणवते. अशातच जाणून घेऊयात 8 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पालघर डॉक्टर मारहाण प्रकरण अंगाशी, राहुल घरत यांची पक्षातून हकालपट्टी

कोकण 

कोकण विभागात पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये हलका तर रत्नागिरीत मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. नंदुरबारमध्ये विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि जळगाव येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाट परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यात जालना, हिंगोली, नांदेड येथे विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.  छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा : आता पुण्यातही Gen-Z संतापले! रस्त्यावर उतरले शेकडो विद्यार्थी, पण नेमकं कारण काय?

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.