Maharashtra Weather: पुन्हा टेन्शन.. मराठवाड्यासाठी पुढचे काही तास धोक्याचे, 'हा' अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यातील विभागात 3 ऑक्टोबर रोजी हवामानाची परिस्थिती कशी असेल याबाबत महत्त्वाची अपडेट पुढीलप्रमाणे :

maharashtra weather (grok)

maharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 03 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार

point

3 ऑक्टोबर रोजी हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये 3 ऑक्टोबर 2025 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असण्याची शक्यता आहे. या एकूण विभागात 3 ऑक्टोबर रोजी हवामानाची परिस्थिती कशी असेल याबाबत महत्त्वाची अपडेट पुढीलप्रमाणे :

हे वाचलं का?

हे ही वाचा :  75 वर्षीय वृद्धाचा 35 वर्षीय महिलेशी विवाह, मधुचंद्राच्या रात्री मृत्यू; आता पोस्टमॉर्टेममधून खळबळजनक खुलासा

कोकण विभाग : 

राज्यातील कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोकण विभागातील एकूण जिल्ह्यांना कसलाही धोका निर्माण होणार नसल्याचा अंदाज आहे. पावसाची विश्रांती असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्र विभाग :

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच याच विभागातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाची चांगली स्थिती दर्शवली आहे.

मराठवाडा विभाग :

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. या एकूण जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव येथे वाऱ्यासह हलका पाऊस राहण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हे ही वाचा :  पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्यात वाल्मिक कराडच्या पोस्टरबाजीची चर्चा, पोस्टरवरील आशयाने वेधलं लक्ष

विदर्भ विभाग :

अकोला. अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दिसून येतो. 

    follow whatsapp