Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. काकाने आपल्याच तीन वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनं सोनगीर गाव हादरून गेलं आहे. नराधम काकाला पोलिसांनी रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नराधमाला फाशी देण्याची मागणी केली आहे. आरोपी काकाचं नाव मयूर बापू माळी असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दसऱ्या दिवशी काही राशीतील लोकांच्या सर्व समस्या दूर होणार, काय सांगतं राशीभविष्य?
काकानेच पुतणीचे लचके तोडले
नवरात्रौत्सवात देवीची पूजा आर्चा केली जाते, पण याच नवरात्रौत्सवात काकानेच पुतणीचे लचके तोडले आहेत. या प्रकरणी पीडितेच्या आईने सोनगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केलं की, सायंकाळच्या सुमारास एक दुधवाला आला असता, सासू दुध घेण्यासाठी गेल्या, तेव्हा माझी तीन वर्षांची मुलगी देखील गेली होती. थोड्यावेळानंतर सासुबाई घरात आल्या तेव्हा त्यांनी मुलीबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, ती चुलत काका मयूर माळी आला होता, तो तिला खेळविण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला होता. थोड्या वेळानंतर ती घरी आली रात्री झोपण्याची तयारी करताना लहान पीडिता मुलगी रडू लागली होती. तेव्हा काय झालं? असं विचारलं. तेव्हा तिचं गुप्तांग दुखू लागलं होतं. लहान मुलीने रडत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
आतून कडी लावली अन्...
शेजारीच राहणाऱ्या नराधम चुलत काकाने त्याच्या घरी नेलं आणि आतून कडी लावली. बाहेर एक बाबा आला आहे असे त्याने तिला सांगितले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर चिमुकलीनं घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. हे संपूर्ण प्रकरण ऐकूण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पीडितेची आई पोलीस ठाण्यात गेली आणि तिनं तक्रार नोंदवली.
हे ही वाचा : 2 ऑक्टोबर रोजी कोकण भागात पावसाची विश्रांती, तर मराठवाड्यात पावसाची स्थिती नेमकी कशी असेल?
सोनगीर पोलिसांनी आरोपी मयुर बापू माळी रा. सोनगीर याला रात्रीच ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन सदर आरोपी काकाविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेने सोनगीर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
ADVERTISEMENT
