उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सवात बंदुक रोखत गोळीबार, हल्लेखोर म्हणाला, 'मी इथला भाई...' नेमकं काय घडलं?

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सवात आनंदाच्या वातावरणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने दहशत माजवण्यासाठी आता थेट शिवसेना शाखाप्रमुख बाळा भुगरे यांच्यावर बंदुक रोखत गोळीबार केल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली.

ulhasnagar crime

ulhasnagar crime

मुंबई तक

02 Oct 2025 (अपडेटेड: 02 Oct 2025, 01:21 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सवात गोळीबार

point

हल्लेखोर म्हणाला मी इथला भाई

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सवात आनंदाचे वातावरण होते, मात्र, याच आनंदाच्या वातावरणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने दहशत माजवण्यासाठी आता थेट शिवसेना शाखाप्रमुख बाळा भुगरे यांच्यावर बंदुक रोखत गोळीबार केल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली. ही घटना 24 नंबर शाळा परिसरातील बंजारा विकास परिषद येथे आयोजित बालाजी मित्र मंडळाच्या गरब्यात घडली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : धुळे : बाहेर भगत आलाय असं सांगून काकाने पुतणीला घरात नेलं, नंतर आतून कडी लावत तीन वर्षांच्या पुतणीचं केलं लैंगिक शोषण

'मी इकडचा भाई आहे'

गरब्याचे आयोजक हे बाळा भुगरे होते, त्यांना रात्री साधारण 11: 45 वाजता सोहम पवारने अडवत गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का? मी इकडचा भाई आहे, असं म्हणत त्याने शस्त्र काढले. त्याच क्षणी आनंदाच्या वातावरणात दहशतीचं सावट पसरलं. तेव्हा बाळा भुगरे यांचा भाऊ आला आणि त्याने मध्यस्थी करत वाचवले.

दोन वेळा गोळीबार

यानंतर संतापलेल्या सोहम पवारने धाक दाखवण्यासाठी हवेत सलग दोन वेळा गोळीबार केला होता. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला. संबंधित प्रकरणाचा बाळा भुंगरे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सोहम पवारला अटक केली आहे. उल्हासनगरात प्रचंड तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

हे ही वाचा : दसऱ्या दिवशी काही राशीतील लोकांच्या सर्व समस्या दूर होणार, काय सांगतं राशीभविष्य?

आपली दहशत प्रस्थापित करण्यासाठी काही गुंड भाई लोक सण उत्सवाच्या काळात गोळीबार करतात आणि सणातील आनंदाचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही दहशतीचं वातावरण कमी करण्यास पोलिसंही असमर्थ ठरले आहेत. कायद्याचा कसला कोणालाही धाकच राहिला नाही.

    follow whatsapp