Manoj Jarange Patil, Beed : "शेतकर्यांच्या उसाचे 15 हजार कापायचे, असं ठरवण्यात आलंय. एक रुपया सुद्धा कापायचा नाही. याला आम्ही पर्याय देतो. नोकरदारांचे पैसे कापा. ज्याला 10 हजार पगार आहे, त्याला अडीच हजार कापा. ज्याला 1 लाख आहे, त्याचे 25 हजार कापा. चौथा हिस्सा कापायचा. पगार फुकटात आहे, वावर तर असणारच त्याला...कमीत कमी चार पाच लाख अधिकारी असतील. या 10 लाख नोकरदारांचे हजार एक कोटी रुपये जमा होती. शेतकऱ्यांचे पैसे कापायचे नाहीत. नोकरदार लोकांचे पैसे कापा. एका एका पक्षाकडे 1-1 हजार लोक आहेत. आता सरकारला मदत करायला रोग आला का? खासदार-आमदारांकडे हजार-हजार कोटींची संपत्ती आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची संपत्ती कमी आहे का? शिंदे साहेबांकडे कमी आहे? उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे पैसे घ्या.. गांधी घराण्याकडे पैसे कमी आहेत. अंबानीकडे पैसे कमी आहेत का? त्यांचे पैसे कापा. नारायण राणेकडे पैसे कमी आहेत का? विखे, मोहिते, चव्हाण या घराण्यांकडे पैसे कमी आहेत का? आमच्या शेतकऱ्यांना लुटण्यापेक्षा उद्योगपतींकडून पैसे घ्या..", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते बीडमधील दसरा मेळाव्यात बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पंकजा मुंडेंच्या दसऱ्या मेळाव्यात वाल्मिक कराडच्या पोस्टरबाजीची चर्चा, पोस्टरवरील आशयाने वेधलं लक्ष
जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्या - जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, सरकारला जाहीरपणे सांगतो, मराठवाड्यात आणि लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. दिवाळीच्या आतमध्ये हे काम करा. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आणि शेतात पाणी साचलंय. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपये भरपाई द्या. ज्यांची जमीन वाहून गेले नाहीत, त्यांना देखील मदत दिली पाहिजे. सरसकट मदत दिली पाहिजे. ज्यांची जमीन वाहून गेली आहे, त्यांना 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्या. ज्यांची जनावरं आणि पीक वाहून गेलं त्यांना 100 टक्के भरपाई मिळावी.
शेतकऱ्यांनी जमीन विकायची नाही, मनोज जरांगेंचं आवाहन
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सरकारने शासकीय नोकरी द्यावी. हमीभाव घ्यायचा त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. शेतीला नोकरीचा द्या. तुम्ही नोकऱ्या नाहीत म्हणता शेतीत काम करणाऱ्या लोकांना 10 हजार पगार द्या. शेतकऱ्यांनी जमीन विकायची नाही. दिवाळीपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बीडमध्ये बैठक बोलवू.. सोलापूर, आहिल्यानगर येथेही बोलवू. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरु करु. शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ देणार नाही.
हेही वाचा : मोठी बातमी: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार पुन्हा बैठकीसाठी एकत्र! नेमक्या कोणत्या विषयावर झाली चर्चा?
ADVERTISEMENT
