Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, 29 जिल्ह्यांवर पावसाचं तांडव

मुंबई तक

• 05:00 AM • 05 Jul 2026

Maharashtra Weather : कोकणापासून मुंबईसह राज्यभरात पाऊस थैमान घालणार आहे. 4 जुलै 2026 रोजी राज्यात अति मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. अशातच 5 जुलै रोजी हवामान विभागाने राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 14 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवलेला आहे. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सून सक्रिय

point

कोकणापासून मुंबईसह राज्यभरात पाऊस थैमान घालणार

point

राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा

Maharashtra Weather : गेली काही दिवस राज्यात मान्सून सक्रिय झालेला दिसून येत आहे, अशातच पुढील 24 तास पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कोकणापासून मुंबईसह राज्यभरात पाऊस थैमान घालणार आहे. 4 जुलै 2026 रोजी राज्यात अति मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. अशातच 5 जुलै रोजी हवामान विभागाने राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 14 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवलेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईसह राज्यभरात पावसाचा धिंगाणा, 10 हजार कर्मचारी अ‍ॅक्टिव्ह मोडवर

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.  

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच विभागांना रेड अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. याशिवाय पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. याच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. तर बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 

हे ही वाचा : Mumbai Monsoon : मुंबईसह राज्यभरात पुढील तीन दिवस पावसाची बॅटिंग, वाहतुकीचे महत्त्वाचे अपडेट

विदर्भ 

विदर्भ विभागातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. याच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.