Maharashtra Weather : राज्यात सध्या थंडीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचं जाणवत आहे. तसेच तापमानात चढ-उतार जाणवतो. तसेच सकाळी आणि रात्री काही भागांमध्ये गारवा जाणवणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता जाणवू शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही दिवस राज्यात थंडावा सौम्य राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, तापमानात घट होण्याची शक्यता आहे. अशातच 21 जानेवारी रोजी वातावरण नेमकं कसं असेल याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 45 मिनिटांऐवजी 20 मिनिटांचा सुसाट होणार प्रवास
कोकण :
कोकण विभागातील रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाण्यात थंडी कायम राहणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तसेच काही भागांमध्ये हवामान ढगाळ असण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात पुढील 2 दिवसांमध्ये फारसा बदल होणार नसल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला. तर काही भागांमध्ये किमान आणि कमाल तापमान नोंदवण्यात आले असून वातावरणात थंडावा जाणवू लागेल.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावाचा परिणाम हा मराठवाडा विभागावर जाणवणार आहे, यामुळे किमान तापमानात घट होईल आणि थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. तसेच थंडावा कायम राहणार असल्याची हवामान विभागाने नोंद केली आहे.
हे ही वाचा : कराडमध्ये दुचाकीला धडक देत बोलेरो युवतींच्या अंगावरून गेली, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद
विदर्भ :
विदर्भात हवामान विभागाने कोरडं वातावरण राहील असा अंदाज वर्तवला आहे. तर किमान तापमानात घट होण्याची शक्यता पुढील काही दिवस कायम राहू शकते, तर कमाल तापमान हे सामान्य राहण्याची शक्यता आहे, यामुळे थंडावा जाणवणार आहे, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT











