कराडमध्ये दुचाकीला धडक देत बोलेरो युवतींच्या अंगावरून गेली, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद
Satara Accident : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दुचाकी आणि चारचाकी बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला असून, हा गंभीर अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक मार्गावर घडली, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कराड शहरात दोन युवतींना भरधाव बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

हे ही वाचा : मुंबईची खबर: CSMT वर ताण कमी होणार... 'या' प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे 15 डब्यांची लोकल सेवा दुप्पट होणार!
कराड शहरात दोन युवतींना भरधाव बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली
घडलेल्या घटनेनुसार, कराड शहरातील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक मार्गावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता, या घटनेनं परिसर हादरून गेला होता. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवतींना भरधाव बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
या धडकेनंतर दोन्ही तरुणी रस्त्यावर आदळल्या आणि नंतर बोलेरो गाडी थेट त्यांच्या अंगावरून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आलं होत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हे ही वाचा : लेस्बियन महिलांचं होतं रिलेशनशिप, नात्यात अडथळा ठरत होता पती, अखेर मिळून निष्पाप व्यक्तीचा काढला काटा
दोन्ही जखमी तरुणींना तात्काळपणे उपचारासाठी कृष्णा हॉस्टिपटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.