मुंबईची खबर: CSMT वर ताण कमी होणार... 'या' प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे 15 डब्यांची लोकल सेवा दुप्पट होणार!
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील नेहमीच्या प्रवाशांसाठी दिलासाजनक बातमी समोर आली आहे. सध्या, 15 डब्यांच्या लोकल गाड्या प्लॅटफॉर्म 7 वरून धावतात आणि या लोकलच्या दररोज 22 सेवा मिळतात. प्लॅटफॉर्म 6 चं पूर्ण झाल्यानंतर, या सेवा दुप्पट होतील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
CSMT स्थानकावरील ताण कमी होणार...
15 डब्यांची लोकल सेवा दुप्पट होणार!
CSMT स्थानकावरील 'या' प्लॅटफॉर्मच्या विस्तार
Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील नेहमीच्या प्रवाशांसाठी दिलासाजनक बातमी समोर आली आहे. या स्थानकावरील प्लॅटफॉर्म 6 चा विस्तार मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे तेथून 15 डब्यांच्या लोकल गाड्या धावू शकतील. सध्या, 15 डब्यांच्या लोकल गाड्या प्लॅटफॉर्म 7 वरून धावतात आणि या लोकलच्या दररोज 22 सेवा मिळतात. प्लॅटफॉर्म 6 चं पूर्ण झाल्यानंतर, या सेवा दुप्पट होतील. रेल्वेने प्लॅटफॉर्म 7 च्या कुर्ला टोकावरील सुमारे 40 वर्षे जुनी, जीर्ण इमारत पाडली असून प्लॅटफॉर्म 18 कडे ट्रान्सफर केलं जात आहेत. यामुळे स्थानकाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
पीक आवर्समधील गर्दी कमी होणार...
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात 15 डब्यांच्या दोन नवीन रेक येतील. प्रत्येक रेक सामान्यतः दररोज 10 ते 12 फेऱ्या पूर्ण करतो. याचाच अर्थ, दोन नवीन रेक जोडल्याने 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या 40 ते 44 फेऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे पीक आवर्समध्ये होणारी गर्दी कमी होईलच, शिवाय प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल. विशेषतः सीएसएमटी-कुर्ला आणि सीएसएमटी-ठाणे कॉरिडॉरवर, प्रवाशांची वाढती संख्या व्यवस्थितरित्या मॅनेज होऊ शकेल.
हे ही वाचा: Govt Job: 10 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी नोकरी! ना लेखी परीक्षा, ना मुलाखत... लवकर करा अप्लाय
पिट लाईनचा विस्तार आवश्यक
दरम्यान, वाढत्या सेवेसह मेंटेनन्सच्या बाबतीत रेल्वेला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सध्या कुर्ला कारशेडमध्ये फक्त एकच पिट लाईन आहे, जिथे 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची देखभाल केली जाते. 15 डब्यांच्या रॅकची संख्या वाढल्याने पिट लाईनवरील दबाव देखील वाढेल. त्यामुळे, मार्च 2026 पूर्वी कारशेडमध्ये अतिरिक्त पिट लाईनचा विस्तार पूर्ण करणे आवश्यक असेल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.
हे ही वाचा: सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे 42 वर्षीय पुरुषाने संपवलं आयुष्य; बसमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप...
ही योजना पूर्ण झाल्यानंतर, सीएसएमटी स्थानकाच्या क्षमतेत लक्षणीयरित्या वाढ होईल आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि सुरळीत लोकल सेवेचा लाभ मिळेल. स्थानकाच्या विस्ताराचं काम पूर्ण झाल्याने सेवा न वाढवता क्षमता वाढते. CSMT येथील प्लॅटफॉर्म 1 च्या विस्तारामुळे 15 डब्यांच्या लोकल सेवेत 22 ने वाढ होईल म्हणजे एकूण 66 कोच होतील, जे 5-12 कोच लोकल ट्रेनच्या समतुल्य आहेत. इतर 34 स्थानकांवरही विस्ताराचे काम सुरू असून त्यापैकी 24 स्थानकांचं काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.










