लेस्बियन महिलांचं होतं रिलेशनशिप, नात्यात अडथळा ठरत होता पती, अखेर मिळून निष्पाप व्यक्तीचा काढला काटा
crime news : फतेहपूर जिल्ह्यातील टीकरा गावात एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. समलैंगिक नातेसंबंधातून ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नीने तिच्या मैत्रिणीसह स्वत:च्या पतीचा बळी घेतला. जेव्हा पोलिसांनी तपास सुरु केला असता, शेतात सापडलेल्या सुमेर सिंगच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात आले, या प्रकरणातील सत्य ऐकून आपणही थक्क व्हाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मालती आणि रेणू यांच्यातील मैत्री समलिंगी
मैत्रित अडथळा निर्माण करत होता पती
नंतर नको तेच कांड केलं
crime news : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील टीकरा गावात एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. समलैंगिक नातेसंबंधातून ही धक्कादायक घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पत्नीने तिच्या मैत्रिणीसह स्वत:च्या पतीचा बळी घेतला. जेव्हा पोलिसांनी तपास सुरु केला असता, शेतात सापडलेल्या सुमेर सिंगच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात आले, या प्रकरणातील सत्य ऐकून आपणही थक्क व्हाल.
हे ही वाचा : लग्नानंतर पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध, विरोध केल्यावर धमक्या आणि छळ; शेवटी पतीने स्वत:ला संपवलं
मालती आणि रेणू यांच्यातील मैत्री समलिंगी
शेतकऱ्याचा सुखाचा संसार सुरु होता, जेव्हा मालती देवी नावाची महिला रेणू नावाच्या महिलेशी संपर्कात आल्यानं शेतकऱ्याचा संसार तुटला. तीन वेळा विवाह झालेल्या मालती आणि रेणू यांच्यातील मैत्री समलिंगी संबंधात बदलल्याचं सांगण्यात येत आहे. त्या दोघांना आपलं आयुष्य एकमेकांसोबत घालवायचं होतं. पण पती सुमेर सिंग हा त्यांच्या नात्यातील मोठा अडथळा निर्माण झाला होता.
मालतीच्या पतीला मारण्यासाठी 8 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला
पतीला आपल्याच पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली असता, सुमेरला मलातीने त्यांच्या घरी येण्यास सक्त मनाई केली होती. मालतीने तिच्या एका जितेंद्र गुप्ता नावाच्या पुरुषाशी संपर्क साधला होता. नंतर पतीच्याच हत्येसाठी तब्बल 60 हजार रुपयांचा सौदा करण्यात आला होता. पत्नी रेणूने मालतीच्या पतीला मारण्यासाठी 8 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला होता, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
14 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कट
14 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास हा कट रचण्यात आला होता. नंतर जितेंद्रने त्याच्या दोन साथीदारांना आपल्यासोबत घेतलं होतं. मारेकऱ्यांनी पती सुमेरचा दोरीने गळा आवळला आणि नंतर धारदार शस्त्राने क्रूरपणे संपवलं. हत्येनंतर काही क्षुल्लक कारणातून वाद झाल्याचे भासवण्याच्या हेतून मृतदेह शेतात फेकण्यात आला.










