पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 45 मिनिटांऐवजी 20 मिनिटांचा सुसाट होणार प्रवास
Pune News : पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खंबाटकी घाटावरील धोकादायक वळणाचा रस्ता आता इतिहासजमा होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यालाच पर्याय म्हणून, दोन नवीन तसेच तीन-लेन बोगद्यांचे बांधकाम सुमारे 90 टक्के पूर्ण झालं आहे. याच बोगद्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरु असल्याची माहिती समोर आली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सातारा-पुणे प्रवासाचा वेळ अंदाजे 20 ते 25 मिनिटे वाचण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
खंबाटकी घाटातील तयार करण्यात आलेला रस्ता 6.46 किमी लांबीचा
Pune News : पुण्याची खबर - पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खंबाटकी घाटावरील धोकादायक वळणाचा रस्ता आता इतिहासजमा होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यालाच पर्याय म्हणून, दोन नवीन तसेच तीन-लेन बोगद्यांचे बांधकाम सुमारे 90 टक्के पूर्ण झालं आहे. याच बोगद्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरु असल्याची माहिती समोर आली. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर सातारा-पुणे प्रवासाचा वेळ अंदाजे 20 ते 25 मिनिटे वाचण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : लेस्बियन महिलांचं होतं रिलेशनशिप, नात्यात अडथळा ठरत होता पती, अखेर मिळून निष्पाप व्यक्तीचा काढला काटा
पुणे ते सातारा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकीचा वळणदार आकाराच्या घाटामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती. सध्या पुणे-सातारा घाटातून रस्ता जात असून काही भागांत हा दुहेरी रस्ता आहे, ज्यामुळे वाहतूक मंदावलेल्या स्वरुपात दिसून येते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. विशेषकरून घाटातील जे धोकादायक रस्ते दूर करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन नवीन बोगदे बांधण्यास हिरवा कंदील मिळाला.
दरम्यान, या प्रकल्पाचे 2019 मध्ये काम सुरु झाले होते. पण नंतर कोरोनामुळे हे काम बंद करण्यात आले होते. नंतर काही काळ काम थांबले होते, खंबाटकी घाटावरील काम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेची अंतिम मुदत ही तीन वर्षांची होती. ती अंतिम मुदत 2026 वर्षापर्यंत वाढवण्यात आले.
खंबाटकी घाटातील तयार करण्यात आलेला रस्ता 6.46 किमी लांबीचा
खंबाटकी घाटातील तयार करण्यात येत असलेला रस्ता सुमारे 6.46 किमी लांबीचा आहे. तीन-लेन दुहेरी बोगदे आहेत, तसेच डावीकडील बाजूस 1307 मीटर लांब आणि उजवीकडे 1224 मीटर लांब, तसेच डावीकडे एक व्हायाडक्ट बांधला जात आहे आणि उजवीकडे 930 मीटर लांब आहे. पुण्याच्या अंतर्गत बोगद्याचे काम सुरु असून ते काम पूर्ण झाल्यास, एक दरी पूल देखील बांधला जाईल. तर 15 टक्के काम बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे.










