Maharashtra Weather : पुढील काही तास महत्त्वाचे, 5 जिल्ह्यांहून अधिक ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट

मुंबई तक

• 05:00 AM • 24 Mar 2026

Maharashtra Weather : सध्या उन्हाळा ऋतू सुरु अलून राज्यात संमिश्र हवामानाची स्थिती आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला आहे. जाणून घेऊयात 24 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

maharashtra weather

maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात संमिश्र हवामानाची स्थिती

point

काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather : सध्या उन्हाळा ऋतू सुरु अलून राज्यात संमिश्र हवामानाची स्थिती आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला आहे. जाणून घेऊयात 24 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे जारी करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालन्यात रेड्याच्या टकरीवरून दोन गटांत वाद, हाणामारीत तरुणाचा दुर्दैवी अंत, 15 दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

कोकण 

कोकणतील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी वातावरणात बदल होताना दिसत आहे. पालघर,रत्नागिरीत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेत वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर जिल्ह्यात कोरडं हवामानाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात हवामान हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला. तसेच सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात जालना, छत्रपती, परभणी, बीड जिल्ह्यात कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला. हिंगोली जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी केला. नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला. 

हे ही वाचा : बीड : पाण्यातून गुंगीचे औषध दिलं, अन् नंतर चुलत्यानेच केला पुतणीवर अत्याचार

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, यवतमाळ, वाशिम, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात कसलाही अंदाज जारी केला नाही.