बीड : पाण्यातून गुंगीचे औषध दिलं, अन् नंतर चुलत्यानेच केला पुतणीवर अत्याचार

मुंबई तक

Beed Crime News : बीडच्या केज तालुक्यात चुलत्याने 19 वर्षीय विवाहित पुतणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : पाण्यातून गुंगीचे औषध दिलं

point

अन् नंतर चुलत्यानेच केला पुतणीवर अत्याचार

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून माणुसकी आणि रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 50 वर्षीय चुलत चुलत्याने आपल्याच 19 वर्षीय विवाहित पुतणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडेगावात घडली असून, तब्बल 5 महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम चुलत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गुंगीचे औषध देऊन अत्याचार आणि कुटुंबाला संपवण्याची धमकी

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, 14 ऑक्टोबर 2025 रोजी ही विवाहित तरुणी आपल्या माहेरी आई-वडिलांकडे आली होती. दुपारी 1:30 ते 3:30 च्या दरम्यान ती शेत वस्तीवर असताना, शेजारीच राहणाऱ्या तिच्या चुलत्याने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्यानंतर नराधमाने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, 'जर ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन' अशी धमकी आरोपीने दिली. या दहशतीमुळे पीडित मुलगी दीर्घकाळ गप्प होती, मात्र त्यानंतर तिने धीर धरून आपल्या पालकांना घडलेली सर्व आपबिती सांगितली.

हेही वाचा : पतीला बाहेर बसवून पत्नीवर लैंगिक अत्याचार, अशोक खरातने पूजा करण्याच्या बहाण्याने अब्रु लुटली; आणखी एक गुन्हा दाखल

युसूफ वडगाव पोलिसात गुन्हा दाखल आणि आरोपीचा शोध सुरू

पीडितेच्या तक्रारीवरून शनिवारी सायंकाळी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात आरोपी चुलत्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 68/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(f) आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे हे करत आहेत. कायद्याच्या विविध कलमांनुसार नराधमावर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पीडितेचा जबाब आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp