पतीला बाहेर बसवून पत्नीवर लैंगिक अत्याचार, अशोक खरातने पूजा करण्याच्या बहाण्याने अब्रु लुटली; आणखी एक गुन्हा दाखल
Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आता आणखी एका पीडित महिलेने गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे पतीला बाहेर बसवून त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीला बाहेर बसवून पत्नीवर लैंगिक अत्याचार
अशोक खरातने पूजा करण्याच्या बहाण्याने अब्रु लुटली; आणखी एक गुन्हा दाखल
Ashok Kharat Case, नाशिक : धार्मिक विधी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पाढा आता अधिकच मोठा होत चालला आहे. नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून, खरात विरोधात आता लैंगिक अत्याचाराचा आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात पीडित महिलेने धाव घेत खरातच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. या नव्या तक्रारीमुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्याच्यावर लावण्यात आलेल्या कलमांची तीव्रता पाहता प्रशासनाने या प्रकरणाचा तपास अधिक वेगवान केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, खरातने केवळ तिचे शारीरिक शोषण केले नाही, तर तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला कायमचे संपवून टाकण्याची धमकीही दिली होती.
हेही वाचा : अशोक खरात प्रकरण : पीडितेला साई बाबाच्या मंदिराजवळ गाठलं, गर्दीतून 'तो' आला; अन् कानात म्हणाला, 'तुझे...'
पूजेच्या नावाखाली अघोरी कृत्य आणि पाशवी अत्याचार
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडिता आणि तिचा पती जेव्हा काही समस्यांच्या निवारणासाठी खरातकडे गेले होते, तेव्हा त्याने पतीला बाहेर बसवून पूजेच्या नावाखाली महिलेला आत बोलावले. अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने घरात नकली साप आणि वाघाची कातडी ठेवली होती, ज्याचा वापर तो लोकांना घाबरवण्यासाठी करत असे. अघोरी कृत्ये आणि तंत्रमंत्राच्या धाकाने त्याने अनेक भाविकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे की, विरोध केल्यास खरात तिला जीवे मारण्याची भीती दाखवत असे, ज्यामुळे ती इतके दिवस गप्प होती. मात्र, आता हिंमत एकवटून तिने पोलिसांकडे या नराधमाचा खरा चेहरा समोर आणला आहे.
हेही वाचा : अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO










