Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल जाणवताना दिसत आहे. काही ठिकाणी दुहेरी हवामानाचं संकट जाणवण्याची अधिकची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यांत उष्णता अधिक जाणवणार असून काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 18 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी खुशखबर, 165 कोटींचं उभारलं कॅन्सर रुग्णालय
कोकण
कोकण विभागात पालघर, मुंबई, या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच दुसरीकडे ठाणे, रायगड या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला हवामान विभागाने हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली. तसेच अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीगर, जालना या दोन जिल्ह्यात हलक्या पावासाची शक्यता वर्तवली आहे. तसेच बीड, नांदेड या या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिंगोली, परभणी, अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. तसेच बीड, नांदेड या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिला. तसेच लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला.
हे ही वाचा : बापाच्या रिसॉर्टवर बोलावून 17 वर्षीय मुलीवर नको तेच, धनिकपुत्राचं मोठं कांड
विदर्भ
विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











