धुळे : धार्मिक पूजन झाले अन् अक्षय, जयश्रीचा जीवच गेला; भोंदू बाबाने काय केले?

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील साक्री तालुका सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे पुरता हादरला आहे.

Dhule Crime

Dhule Crime

मुंबई तक

17 May 2026 (अपडेटेड: 17 May 2026, 10:29 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

धुळे : धार्मिक पूजन झाले अन् अक्षय

point

जयश्रीचा जीवच गेला

point

भोंदू बाबाने काय केले?

Dhule Crime, रोहिणी विशाल ठाकूर : महाराष्ट्रातील भोंदू बाबा आणि त्यांच्या कारनाम्याच्या अनेक घटना समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातून समोर येत आहे. येथील साक्री तालुका सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे पुरता हादरला आहे. भडगाव आणि जेताणे शिवारात जयश्री रजनीकांत काकुस्ते (रा. कासारे) आणि तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे (रा. भाडणे) यांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

'अशी' करण्यात आली हत्या

जयश्रीचा काकुस्ते हिचा ओढणीने गळा आवळून, तर अक्षय सोनवणे याची डोक्यावर वार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी योगेश बापू खैरनार (रा. जेताणे) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. 

हे ही वाचा : जळगाव : कोणी नसताना ZP शिक्षक विद्यार्थीनीला वर्गखोलीत बोलावायचा, अन्...

धार्मिक पूजनानंतर वाद

संजय गुलाब हिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धार्मिक पूजनानंतर झालेल्या वादातून हे हत्याकांड घडले. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांनी संशयित योगेश खैरनार याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तो स्वतःला 'महाराज' म्हणवून घेत तंत्र-मंत्र, वशीकरण आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. 

हे ही वाचा : “बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे RTI कार्यकर्ते, सोशल मीडिया युजर्स बनतात अन्..”, सरन्यायाधीश काय म्हणाले?

गोशाळेत सापडले सांगाडे

खैरनार याच्या 'ओम शिव गोरक्ष योगी नवनाथ मंदिर' परिसरात गोशाळा होती, तिथे गायींचे सांगाडे पडल्याचेही समोर आले आहे. तसेच महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात चोरीच्या केबल पकडून देत पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. सध्या अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वाडने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, या धक्कादायक प्रकारामुळे साक्री तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.