Government Jobs : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) कडून Non-Executive पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. 14 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 268 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम आणि सुवर्णसंधी चालून आली आहे.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष आणि पगार
या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी ठेवण्यात आली असून, यामध्ये 10 वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI), डिप्लोमा आणि बी.एस्सी (B.Sc) पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा 27 ते 45 वर्षे (पदाच्या आवश्यकतेनुसार) दरम्यान असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाईल, ज्यामध्ये 'T0 ग्रेड'साठी 29,500 ते 70,000 रुपये आणि ज्युनियर फोरमनच्या 'S0 ग्रेड'साठी 36,500 ते 1,15,000 रुपये प्रतिमहिना वेतन असेल.
हे ही वाचा : फडणवीसांचा राखीव प्रवर्गाबाबतचा 'तो' निर्णय वादात का आलाय? टीकेचा सूर, माजी खासदार भडकले...
अर्ज करण्याची अंतिम मुदत
इच्छुक आणि पात्र उमेदवार नॅलकोच्या www.nalcoindia.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू होणार असून, सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत 10 जून निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा : '...तर 30 मे पासून आमरण उपोषण' मनोज जरांगेंचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा
अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी सामान्य (UR), ओबीसी (OBC-NCL) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD), माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त (Land Ousted) आणि अंतर्गत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही, त्यांना या शुल्कातून पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











