ठाणे : बेपत्ता अरबाज खानची बॉडी गटारीतील हिरव्या ड्रममध्ये सापडली, पोलिसांकडून मोठा उलगडा!

Mumbra murder case : मुंब्र्यातून बेपत्ता झालेल्या अरबाज खान या युवकाची खंडणीसाठी त्याच्या प्रियसीने, तिच्या पतीने आणि भावाने मिळून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार एक महिन्यानंतर उघडकीस आला आहे.

Mumbra murder case

Mumbra murder case

मुंबई तक

16 May 2026 (अपडेटेड: 16 May 2026, 12:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बेपत्ता तरुणाचा मृतदेह गटारीतील ड्रममध्ये सापडला

point

पोलीस तपासातून सगळा उलगडा

Mumbra murder case : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत भयानक घटना उघडकीस आली आहे. मुंब्र्यातून अचानक बेपत्ता झालेल्या अरबाज खान या युवकाचा त्याच्याच प्रियसीने पती, भाऊ आणि एका मित्राच्या मदतीने खून केल्याचे एका महिन्यानंतर तपासात निष्पन्न झाले आहे. 3 एप्रिल 2026 रोजी अरबाज हा दादर येथे आपल्या कामाचे पैसे घेण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघाला होता, मात्र तो परत न आल्याने त्याच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, मयत अरबाज आणि त्याची प्रेयसी मेहजबीन शेख या दोघांचे मोबाईल लोकेशन वसई परिसरात एकाच दिवशी एकत्र आल्याचे आढळून आले. या संशयावरून पोलिसांनी मेहजबीनला ताब्यात घेऊन विश्वासात घेत सखोल चौकशी केली असता तिने या थरारक हत्याकांडाची कबुली दिली.

हे वाचलं का?

हेही वाचा : धुळे : बायकोसमोर रागावल्याने मुलगा संतापला, डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची हत्या

मेहजबीनने दिलेल्या कबुलीनुसार, तिने तिचा पती हसन, भाऊ तारीक शेख आणि त्याचा मित्र मुज्जुम पठाण यांच्यासोबत मिळून अरबाजकडून खंडणी वसूल करण्याचा आणि त्याला जिवे मारण्याचा कट आधीच रचला होता. या पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून त्यांनी अरबाजला वसई येथे बोलावून घेतले आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, अरबाजकडे पैसे नसल्याने आरोपींनी क्रूरतेची सीमा पार करत त्याचे हातपाय बांधले आणि त्याला प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण करून जिवे ठार मारले. हत्येनंतर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी अरबाजचा मृतदेह एका मोठ्या हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरला आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन स्थळी असलेल्या नाल्यात (गटारीत) फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावली.

हेही वाचा : पुणे : 'या' कारणामुळे हॉस्पिटलमध्ये ठेवला बॉम्ब, आरोपीचा धक्कादायक खुलासा

हिरव्या ड्रममध्ये सापडला सडलेला मृतदेह; पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

या क्लिष्ट गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कडक सूचना आणि मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांचे एक विशेष पथक तात्काळ वसई परिसरात रवाना झाले होते. अटक करण्यात आलेला आरोपी तारीख शेख याने दाखवलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी वालीव येथील नाल्यातून अरबाजचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह अखेर ताब्यात घेतला. अरबाजचा मृतदेह ड्रममध्ये अशा अवस्थेत मिळाल्याने वसई आणि मुंब्रा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता असणाऱ्या नोंदीचे रूपांतर करून 3 मे 2026 रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, मृतदेह हस्तगत केल्यानंतर हत्येच्या कलमांची वाढ करण्यात आली आहे.

प्रियसीसह भाऊ गजाआड; पती आणि मित्राचा शोध सुरू

मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने कारवाई करत अरबाजची प्रियसी मेहजबीन खातून आणि तिचा भाऊ तारीक शेख या दोन मुख्य आरोपींना 7 मे 2026 रोजी अटक केली आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 14 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आणि मेहजबीनचा फरार पती हसन तसेच तारीकचा मित्र मुअज्जम पठाण या आरोपींचा पोलीस सध्या कसून शोध घेत आहेत. पोलीस उप आयुक्त प्रिया डमाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकत असून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

फडणवीसांचा राखीव प्रवर्गाबाबतचा 'तो' निर्णय वादात का आलाय? टीकेचा सूर, माजी खासदार भडकले...